Eknath Shinde Khed Ralley: ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांनी सभा घेतली त्याच ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी सभा घेतली. तेच खेड, तेच मैदान आणि तीच वेळ..... ठाकरेंनी खेडमध्ये घेतलेल्या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खेडमधल्या गोळीबार मैदानातच जाऊनच उत्तर दिले. उद्धव ठाकरेंच्या सभेपेक्षा मोठी सभा घेण्याची शिंदे गटाचे नेते रामदास कदम आणि त्यांचे पुत्र आमदार योगेश कदम यांनी खास रणनीती आखली होती. या सभेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोकणी माणूस धनुष्यबाण आणि शिवसेनेच्या पाठीशी आहे. कोकणातील आमदार सुरुवातीपासून लढ्यात सोबती होते. शिवसेनेच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांनी माझ्या भूमिकेला पाठिंबा दिला. कोकणी माणूस एकदा शब्द दिला की मागे फिरत नाही. कोकणासोबत माझं जिव्हाळ्याचं नात आहे. कोकणाचा माणूस प्रेमळ आहे. शब्दाला जागणारा आहे असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोकणातील सर्व आमदारांचे कौतुक केले.  


सत्तेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे पक्ष दावणीला लावला होता. धनुष्यबाण गहाण ठेवला होता. शिवसेना पक्ष आम्ही वाचवला. मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीसाठी गद्दारी केली. नेत्यांनी लाखो कार्यकर्त्यांनी शिवसेना घराघरात पोहचवली. सत्ता स्थापनेसाठी एका क्षणात निर्णय घेतला. 


सत्ता येते, सत्ता जाते, पैसा येतो, पैसा जातो, मात्र, एकदा नाव गेले की ते परत मिळवता येत नाही.  गद्दाकरी आम्ही केली नाही गद्दारी 2019 ला झाली. ज्यांनी मुंबईत बॉम्बस्फोट घडवले त्यांना साथ देणारे त्यांच्याशी व्यवहार करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून कसे काय बसू शकता? हीच हिंदूत्वाशी गद्दारी आहे. राहुल गांधी वारंवार स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करतात. यावर का बोलत नाहीत? असा सवाल मुख्यमंत्री यांनी उपस्थित केला. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरोधात भाष्य करणाऱ्या मणीशंकर अय्यर याला बाळासाहेब यांनी चपलेने मारले होते असे मुख्यमंत्री म्हणाले. 


जो पक्षाचा अध्यक्ष बनण्याची जबाबदारी घेऊ शकत नाही. जो राज्य जिंकू शकत नाही ते देश कसा जिंकू शकतो. त्या राहुल गांधीला तुम्ही पंतप्रधान बनवायला निघाले आहात?  परदेशात आपल्या देशाची बदनामी करणा-या राहुल गांधींना पंतप्रधान बनवणार का तुम्ही? असे सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केले. एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री बाळासाहेब ठाकरे रामदास कदमसारख्या वाघाला पाळायचे अन् तुम्ही सुभाष देसाईंसारख्या शेळ्यामेंढ्यांना घेऊन फिरताय. तुम्ही मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी विचारधारा सोडून दिली. कांग्रेस - राष्ट्रवादीसाठी बाळासाहेबांचा मुलगा अणि नातू मतं मागतो. यापेक्षा दुसरं दुर्देव काय ?  उद्धव ठाकरे मुख्यमंत्री कसे बनले मला चांगलं माहित आहे असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. 


जे जायचे आहेत त्यांना जाऊदे असं ते म्हणाले. शेवटी दोघेच राहतील. हम दो, हमारे दो... माझे कुटूंब, माझी जबाबदारी... असं म्हणत मुख्यमंत्री यांनी उद्धव ठाकरे यांची खिल्ली उडवली.