शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांना इन्कम टॅक्सची नोटीस; 18 कोटींचा गैरव्यवहार, 7 कोटींची रोकड चोरी
शिंदे गटांच्या खासदार भावना गवळी ( MP Bhavna Gawli ) यांना आयकर विभागाने नोटीस बजावली आहे. विविध संस्थांच्या माध्यमातून मनी लॉन्ड्रिंग केल्याचा आरोप भावना गवळी यांच्यावर झाला होता. यातीलच एका प्रकरणात भावना गवळी यांना ही नोटीस बजवण्यात आल्याचे समजते. 18 कोटींचा गैरव्यवहार आणि 7 कोटींची रोकडची चोरी या प्रकरणात भावना गवळी यांच्याविरोधात तक्रार झाली होती. आता या सर्वाचा तपशील भवान गवळी यांना द्यावा लागणार आहे.
Bhavana Gawali : शिंदे गटांच्या खासदार भावना गवळी ( MP Bhavna Gawli ) यांना आयकर विभागाने नोटीस बजावली आहे. विविध संस्थांच्या माध्यमातून मनी लॉन्ड्रिंग केल्याचा आरोप भावना गवळी यांच्यावर झाला होता. यातीलच एका प्रकरणात भावना गवळी यांना ही नोटीस बजवण्यात आल्याचे समजते. 18 कोटींचा गैरव्यवहार आणि 7 कोटींची रोकडची चोरी या प्रकरणात भावना गवळी यांच्याविरोधात तक्रार झाली होती. आता या सर्वाचा तपशील भवान गवळी यांना द्यावा लागणार आहे.
भावना गवळी या वाशिम-यवतमाळच्या शिवसेना शिंदे गटाच्या खासदार आहेत. भावना गवळी यांच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठान (Mahila Utkarsh Foundation) आर्थिक व्यवहारा प्रकरणी 29 डिसेंबर रोजी आयकर विभागाने नोटीस (Income Tax Department notice) बजावली आहे. भावना गवळी यांना 5 जानेवारी पर्यंत आयकर विभागाला उत्तर सादर करावा लागणार आहे.
18 कोटी 18 लाख 40 हजार 467 रुपयांच्या गैरव्यवहार आणि 7 कोटी रोख रुपयांच्या चोरी बाबत 12 मे 2020 रोजी रिसोड पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल झाली होती. या आर्थिक व्यवहार संदर्भातील विवरण त्यांना आयकर विभागामध्ये सादर करावालागणार आहे. यापूर्वी महिला उत्कर्ष प्रतिष्ठानमधील मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी भावना गवळी यांना ईडीकडून समन्स देखील बजावण्यात आले होते.
भावना गवळी या ईडीच्या फेऱ्यात अडकल्या होत्या. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत भाजपच्या मदतीने राज्यात नवे सरकार स्थापन करत उद्धव ठाकरेंना धक्का दिला. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेना पक्षात उभी फुट पडली. या दरम्यानच भावना गवळी या उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे गटात सहभागी झाल्या.