सातारा : राज्यभर कोरोनाचं थैमान सुरू आहे. दररोज हजारो नागरिकांना कोरोनाचा संसर्ग होत आहे. कोरोनाचं थैमान फक्त शहरांपूरताच नाही तर ग्रामीण भागातही सुरू आहे. तरीदेखील साताऱ्यातील बावधनमध्ये बगाड यात्रा काढण्यात आली होती. त्यामुळे आता या परिसरात मोठ्या संख्येने रुग्णांची वाढ होताना दिसून येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 
 साताऱ्यातील प्रसिद्ध अशी बगाड यात्रा दरवर्षी भरत असते. यंदा कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यात्रेला परवानगी नाकारण्यात आली होती. प्रशासनाच्या सूचनांकडे काना डोळा करीत गावकऱ्यांनी बगाड यात्रा भरवली होती.


 यात्रेचं आयोजन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. तर काहींना दंड ठोठवण्यात आला होता. आता या परिसरात कोरोना रुग्णांची संख्या वाढण्यास सुरूवात झाली आहे. ही यात्रा झाल्यापासून आतापर्यंत 60 जणांना कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले आहे.


आजुबाजूच्या  वाड्यांमध्येही कोरोनाचा आकडा वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.  दरम्यान, गावकऱ्यांनी कोरोना तपासणीसाठी स्वॅब घेण्याला कडाडून विरोध केला आहे. लगतच्या वाई तालूक्यातही कोरोनाच्या वाढत्या आकड्यांनी चिंतेत भर घातली आहे.