Sanjay Raut Security : ठाकरे गटाचे  (Thackeray Group) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. (Maharashtra political News) आपल्या जीवाला धोका असल्याचे पत्र उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडवणीस (Devendra Fadwanis) यांनी लिहिले होते. या पत्राची दखल फडणवीस यांनी घेतली आहे.  (Maharashtra political News in Marathi) दरम्यान, संजय राऊत यांचा जबाब नोंदवण्यासाठी नाशिकमध्ये ठाणे पोलिसांचं पथक दाखल झाले आहे. (Maharashtra News in Marathi)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी गंभीर आरोप केला होता. आपल्या जीवाला धोका असल्याचं सांगत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडून आपल्या जीवाला धोका असल्याचं म्हटल होते. संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहित हा गौप्यस्फोट केला होता. संजय राऊत यांच्या आरोपांमुळे शिंदे-ठाकरे गटातील कलह आणखी वाढण्याची चिन्ह आहेत. दरम्यान, या आरोपानंतर राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. मी हे सुरक्षेसाठी केलेले नाही, असे स्पष्टीकरण राऊत यांनी दिले होते.


 संजय राऊत यांनी काय म्हणलेय पत्रात?


गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींना धमक्या देण्याचे आणि हल्ले करण्याचे प्रमाण वाढलेय. ही महाराष्ट्राची परंपरा नाही. महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर माझी सर्व सुरक्षा व्यवस्था हटविण्यात आली. माझी त्याबद्दल तक्रार नाही. असे राजकीय निर्णय होत असतात. लोकप्रतिनिधींची सुरक्षा हा सरकारचा विषय आहे आणि गृहमंत्री (देवेंद्र फडणवीस) म्हणून आपण त्याबाबत सक्षम आहात, तरीही एक गंभीर बाब मी आपल्या निदर्शनास आणू इच्छितो. ठाण्यातील एक कुख्यात गुंड राजा ठाकूर आण त्याच्या टोळीस माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी खासदार श्रीकांत शिंदेंकडून देण्यात आल्याची माहिती मला मिळाली आहे. सध्या महाराष्ट्रातील वातावरण पाहता हा विषय आपल्या निदर्शनास आणणे आवश्यक आहे.