Holi Special Trains For Kokan:  कोकणात होळी (holi 2023) सणाचा आनंद वेगळात असतो. या सणानिमित्त लाखो कोकणवासी मुंबईहून आपल्या गावी जात असतात. कोकणात जवळपास तीन ते चार दिवस होळी साजरी केली जाते. याच पार्श्वभूमीवर होळी (Holi Special Trains 2023) सणानिमित्ताने मोठ्या संख्येने कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचा विचार करता मध्य आणि कोकण रेल्वेकडून विशेष ट्रेन गाड्यांचा चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या ट्रेनसाठी ऑनलाईन तिकीट बुकींग सुविधा देखील सुरू करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1 . CSMT-रत्नागिरी विशेष (3 सेवा)


01151 विशेष गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 4 मार्च आणि 07 मार्चला मध्यरात्री 00.30 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी सकाळी 09.00 वाजता रत्नागिरीला पोहोचेल.
तर 01152 स्पेशल रत्नागिरीहून 6 मार्चला सकाळी 06.30 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी 13.50 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल.
थांबा: दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिलपुण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड


2. पनवेल-रत्नागिरी विशेष (4 सेवा)


01153 विशेष गाडी 5.3.2023 आणि 8.3.2023 रोजी पनवेलहून संध्याकाळी 18.20 वाजता सुटेल आणि रत्नागिरीला दुसऱ्या दिवशी मध्यरात्री 00.20 वाजता पोहोचेल.
01154 विशेष गाडी रत्नागिरीहून 4.3.2023 आणि 7.3.2023 रोजी सकाळी 10.00 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी 16.20 वाजता पनवेलला पोहोचेल.
थांबा: रोहा, माणगाव, वीर, खेड, चिलपुण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड.


3. पनवेल-सावंतवाडी रोड स्पेशल (4 सेवा)


01155 विशेष गाडी पनवेलहून 4.3.2023 आणि 7.3.2023 रोजी संध्याकाळी 18.20 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 04.10 वाजता सावंतवाडी रोडला पोहोचेल.
01156 विशेष गाडी सावंतवाडी रोडवरून 5.3.2023 आणि 8.3.2023 रोजी सकाळी 07.45 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी संध्याकाळी 17.20 वाजता पनवेलला पोहोचेल.
थांबा: रोहा, माणगाव, वीर, खेड, चिलपुण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ.


4. रत्नागिरी-एलटीटी वन वे स्पेशल


01158 स्पेशल रत्नागिरी येथून 9.3.2023 रोजी सकाळी 06.30 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी 13.30 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.
थांबे: संगमेश्वर रोड, आरवली रोड, सावर्डा, चिलपुण, खेड, वीर, माणगाव, रोहा, पनवेल आणि ठाणे 


ट्रेनचे बुकींग करण्यासाठी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर या विशेष गाड्यांचे बुकिंग तात्काळ उघडण्यात आले आहे. थांब्यांच्या वेळेच्या तपशीलासाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES अॅप डाउनलोड करा प्रवाशांना स्वत:च्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी कोविड योग्य वर्तन पाळण्याचा सल्ला दिला जात आहे.


होळीनिमित्त महत्त्वाचा निर्णय


होळी आणि धुळवळीनिमित्त नागपूर महानगरपालिकेची शहर बससेवा आज  सायंकाळी  8 वाजल्यापासून ते मंगळवारी संपुर्ण दिवस बंद राहणार आहे . तर मेट्रो सेवाही थोड्या कालावधी करता बंद असणार .धुळवडीला म्हणजे उद्या (7 मार्च) मेट्रो प्रवासी सेवा दुपार पर्यंत बंद असेल. दुपारी 3.00 वाजतानंतर ऑरेंज लाईन  लाईन (आटोमोटिव्ह चौक ते खापरी मेट्रो स्टेशन) आणी अँक्वा लाइन सुरू होईल. आठ तारखेला शहर बससेवा आणि मेट्रो प्रवासी सेवा या दोन्ही प्रवासी सेवा पूर्ववत राहतील