मुंबई : कोरोनाव्हायरसमुळे, लोकांचे जीवन अद्याप पूर्णपणे सामान्य झाले नाही. कोरोनाची पहिली लाट जातेय तोपर्यंतर कोरोनाची दुसरी लाट भारतात आली आणि आता तर कोरोनाचे वेगवेगळे व्हेरीअँट देखील भारतात पाहिले गेले आहे. ज्यामुळे परिस्थिती अत्यंत गंभीर होऊ लागली आहे. कोरोनाचा परिणाम भारतीय रेल्वेवरही झाला आहे. यामुळेच बऱ्याच काळापर्यंत भारतीय रेल्वेने स्वतंत्रपणे लोकांना आपली सेवा पुरवू शकले नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परंतु या आता कोकणातल्या लोकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. कारण मध्य रेल्वेने गणपती उत्सवाच्या निमित्ताने 72 विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.



प्रवाशांची सोय लक्षात घेऊन भारतीय रेल्वेने मुंबई आणि त्याच्या आसपासच्या भागात या गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. या गाड्या मुंबईच्या छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि पनवेलापासून, सावंतवाडी रोड ते रत्नागिरी दरम्यान धावतील. या विशेष गाड्यांच्या तिकिटांचे बुकिंग 8 जुलै 2021 पासून सुरू झाले आहे. जर तुम्हाला गर्दीतून प्रवास करायचा नसेल, तर आताच आपले बुकिंग करून घ्या. प्रवाशांची सोय लक्षात घेऊन रेल्वेने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे


या विशेष गाड्यांचे बुकिंग आयआरसीटीसीच्या अधिकृत संकेतस्थळावर, irctc.co.in वर जाऊन करता येते. रेल्वे मंत्रालयाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून या गाड्यांची माहिती दिली आहे. रेल्वे मंत्रालयाने ट्वीट केले आहे की, "येणाऱ्या गणेश चतुर्थीमध्ये प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता, गणपती महोत्सव विशेष गाड्या भारतीय रेल्वेद्वारे चालवल्या जातील. या अतिरिक्त गाड्या प्रवास अधिक सोयीस्कर आणि सुरळीत करतील."


CSMT- सावंतवाडी रोड डेली स्पेशल


ट्रेन क्रमांक 01227 ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दररोज 5 सप्टेंबर 2021 ते 22 सप्टेंबर 2021 दरम्यान रात्री 00 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी सावंतवाडी रोडला 14.00 वाजता पोहोचेल. 01228 विशेष गाडी सावंतवाडी रोड येथून दररोज 5 सप्टेंबर 2021 ते 22 सप्टेंबर 2021 दररोज सावंतवाडी रोडवरुन दररोज 14.40 वाजता सुटेल जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी 04.35 वाजता पोहोचेल.


CSMT-रत्नागिरी द्वि-साप्ताहिक विशेष ट्रेन


ट्रेन क्रमांक 01229 द्वि-साप्ताहिक विशेष ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरुन प्रत्येक सोमवारी आणि शुक्रवारी 6 सप्टेंबर 2021 ते 20 सप्टेंबर 13.10 दरम्यान सुटेल आणि त्याच दिवशी 22.35 वाजता रत्नागिरीला पोहोचेल. 01230 द्वि-साप्ताहिक स्पेशल रत्नागिरी येथून दर रविवारी आणि गुरुवारी 9 सप्टेंबर 2021 ते 23 सप्टेंबर 2021 रोजी 23.10 वाजता रत्नागिरी येथून सुटेल आणि दुसर्‍या दिवशी 08.20 वाजता CSMT येथे पोहोचेल.


पनवेल- सावंतवाडी रोड 3-साप्ताहिक स्पेशल


ट्रेन क्रमांक01231 3-साप्ताहिक विशेष गाडी प्रत्येक मंगळवार, बुधवार आणि शनिवारी 7 सप्टेंबर, 2021 ते 22 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 11.00 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी सावंतवाडी रोडला 20.20 वाजता पोहोचेल.  01232 3-साप्ताहिक स्पेशल सावंतवाडी रोड येथून दर मंगळवार, बुधवार आणि शनिवारी 7 सप्टेंबर, 2021 ते 22 सप्टेंबर, 2021 पर्यंत 20.55 वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी 07.10 वाजता पनवेलला पोहोचेल.


पनवेल- रत्नागिरी द्वि-साप्ताहिक विशेष


01233 द्वि-साप्ताहिक विशेष ट्रेन दर गुरुवार आणि रविवारी 9 सप्टेंबर, 2021 ते 23 सप्टेंबर, 2021 दरम्यान पनवेल येथून 8.00 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 15.40 ​​वाजता रत्नागिरीला पोहोचेल. 01234 द्वि-साप्ताहिक विशेष 6 सप्टेंबर 2021 ते 20 सप्टेंबर 2021 या कालावधीत दर सोमवारी आणि शुक्रवारी 23:30 वाजता रत्नागिरीहून सुटेल आणि दुसर्‍या दिवशी 06.00 वाजता पनवेलला पोहोचेल.