मस्तच! वंदे भारत एक्स्प्रेसला मुंबईतील `या` 2 स्थानकांत थांबा, वेळापत्रक पाहा
Mumbai Vande Bharat Express Updates: महाराष्ट्रातील प्रवाशांना एक आनंदाची बातमी समोर आली आहे. वंदे भारत एक्स्प्रेसला आता मुंबईलगत दोन थांबा मिळणार आहेत.
Maharashtra Vande Bharat Express: वंदे भारत एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. छत्रपती शिवाजी टर्मिन्सस (CSTM) येथून सुटणाऱ्या सोलापूर (CSTM-Solapur) आणि शिर्डी (CSTM-Shirdi) या दोन वंदे भारत एक्स्प्रेसना मुंबईतील दोन स्थानकांत थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची माहिती मध्य रेल्वेने बुधवारी एक पत्रक जारी करुन दिली आहे.
छत्रपती शिवाजी टर्मिनन्स येथुन सुटणाऱ्या शिर्डी आणि सोलापूर या ट्रेनना आता ठाणे आणि कल्याण स्थानकांत थांबा देणार आहे. ठाणे जिल्ह्यातील प्रवाशांना वंदे भारत एक्स्प्रेस गाठण्यासाठी दादर किंवा सीएसएमटी स्थानकात जावे लागते. त्यांची ही कसरत थांबण्यासाठी ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी दोन्ही ट्रेनला ठाणे स्थानकात थांबा देण्याची मागणी केली होती. त्यानंतर मध्य रेल्वेने एक पत्रक जारी शिर्डी आणि सोलापूर स्थानकात ४ ऑगस्टपासून थांबा दिला जाणार आहे.
CSMT- शिर्डी
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून शिर्डीला जाणाऱ्या वंदे भारतला दादर, ठाणे, नाशिक रोड या ठिकाणी थांबा आहे. ही गाडी सकाळी 6 वाजून 15 मिनिटांनी CSMTहून निघते. त्यानंतर सकाळी 6.49 मिनिटांनी ती ठाणे स्थानकात पोहोचणार आहे. त्यानंतर दोन मिनिटे गाडी स्थानकात थांबेल व नंतर पुढील स्टेशन कल्याण गाठेल. कल्याण स्थानकात सकाळी 7.11 वाजता ही गाडी पोहोचेल व 7.13 मिनिटांनी मार्गस्थ होईल.
शिर्डी- CSMT
सध्या या गाडीला दादर, कल्याण, पुणे, कुर्डुवाडी येथे थांबा आहे
शिर्डी साईनगर- CSMT गाडी रात्री 10.06 वाजता ठाणे स्थानकात पोहोचेल आणि 10.08 वाजता मार्गस्थ होईल. तर, कल्याण स्थानकात रात्री 9.45 वाजता पोहोचेल आणि रात्री 9.47 वाजता मार्गस्थ होईल.
CSMT-सोलापूर
सीएसएमटी- सोलापूर वंदे भारत संध्याकाळी 4.33 वाजता ठाणे स्थानकात पोहोचेल आणि 4.35 वाजता मार्गस्थ होईल. तर, कल्याण स्थानकात ही गाडी 4.53 वाजता पोहोचेल आणि 4.55 वाजता मार्गस्थ होईल.
सोलापूर- CSMT
सोलापूर- सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेस सकाळी 11.33 वाजता कल्याण स्थानकात पोहोचेल आणि 11.35 वाजता मार्गस्थ होईल. सोलापूर-सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेस सकाळी 11.50 वाजता ठाणे स्थानकात पोहोचेल आणि 11.52 वाजता मार्गस्थ होईल.
वेळापत्रक पाहा