बीड :  माझ्या कीर्तनाचे क्लिप तयार करून अनेकांनी भरपूर पैसे कमवले आणि त्यामुळे आपल्याविरोधात तक्रारी दाखल होतात असं वक्तव्य इंदूरीकर महाराजांनी (indurikar maharaj) केलं होतं. इतकंच नाहीत तर माझ्या किर्तनाचे व्हिडिओ रेकॉर्ड करुन त्याची कमाई करणाऱ्यांची मुलं दिव्यांग म्हणून जन्माला येतील असं वादग्रस्त वक्तव्यही इंदूरीकर महाराजांनी केलं होतं. यावर प्रचंड टीका होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यामुळे आता कीर्तनकार इंदूरीकर महाराज यांनी मोबाईलचा चांगलाच धसका घेतला आहे. काल धारूर तालुक्यातील कासारी बोडखा गावात इंदूरीकर महाराज यांचं कीर्तन होतं. या कीर्तन सोहळ्यात इंदूरीकर यांनी मोबाईलवर शूटिंग करणाऱ्या व्यक्तींना मोबाईल बंद करण्यास भाग पाडलं. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ पुन्हा व्हायरल होतोय. 


इंदूरीकर महाराजांचं किर्तन सुरु असताना काही जण मोबाईलवर चित्रीकरण करत होते, याकडे इंदुरीकर महाराजांचं लक्ष गेलं, त्यांनी तात्काळ त्या चित्रीकरण करणाऱ्यांना मोबाईल बंद करण्यास सांगतिलं. 


इंदुरीकर महाराजांचं वादग्रस्त वक्तव्य
इंदुरीकर महाराज आपल्या वक्तव्याने नेमहमीच चर्चेत असतात. नुकतंच केलेल्या त्यांच्या एका वक्तव्याने त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. आपल्या कीर्तनाचे व्हिडिओ क्लिपन बनवून चार हजार लोक कोट्यधीश झाले, पण त्यामुळे आपण अडचणीत आलो, माझ्या व्हिडिओवर कमाई करणाऱ्यांची मुलं दिव्यांग जन्माला येतील असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं होतं.