दिल्लीतील महायुतीच्या बैठकीत सत्तास्थापनेवर तब्बल दीड तास मंथन झालं.. या बैठकीत मुख्यमंत्री कोण होणार आणि मंत्रिमंडळात कुणाला कोणतं खातं मिळणार हे जवळपास निश्चित झाल्याची माहिती आहे. महायुतीत कुणाच्या वाट्याला कोणतं खातं येणार याचा आढावा घेऊयात आमच्या इनसाईट स्टोरी या खास रिपोर्टमधून.. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा फैसला दिल्लीतल्या महायुतीच्या बैठकीत झाल्याची खात्रीलायक माहिती समोर आलीय. गुरुवारी महायुतीचे नेते अमित शाहांसोबत बैठकीसाठी दिल्लीत गेले होते. दिल्लीतल्या थंडीत महाराष्ट्राच्य़ा राजकारणाची गरमागरम चर्चा झाल्याचं सांगण्यात येतंय. दिल्लीत अमित शाहांच्या तब्बल दीड तास महायुतीच्या नेत्यांची खलबतं झाली...


- भाजपचाच मुख्यमंत्री होणार असल्याचा प्रस्ताव एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. 


- तसेच देवेंद्र फडणवीसांच्या  मुख्यमंत्रिपदावर शिक्कामोर्तब झाल्याची  माहिती आहे.. 


- महायुतीच्या बैठकीत शिंदेंकडून गृहखात्याची मागणी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.. 


- तसेच भाजपनं गृहखातं सोडण्यास स्पष्ट नकार दिल्याची माहिती आहे. 


- अर्थ, नगरविकास, महसूल खात्यांवर चर्चा झालीय.. 


- भाजपकडील सांस्कृतिक खात्यावरही चर्चा झाल्याची सूत्रांनी माहिती दिलीय.. 


- शिवसेनेकडून महत्त्वाच्या खात्यांची मागणी केलीय येवढचं नाही तर शिंदेंनी 12 खात्यांची मागणी केलीय 


- महायुतीच्या बैठकीत एकनाथ शिंदेंना दोन ऑफऱ देण्यात आल्यात 


- तसेच त्यांना उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर देण्यात आल्याची माहिती आहे. 


- शिंदेंना केंद्रात मंत्रिपदाची ऑफर देण्यात आली आहे. 



बैठक सकारात्मक झाली पण त्याचा तपशील एकनाथ शिंदेंनी सांगणं टाळलं. भाजपचाच मुख्यमंत्री होणार हे महायुतीच्या बैठकीत ठरल्याचा दावा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी केला आहे. लवकरच राज्यात नवं सरकार येणार असल्याचा विश्वास बैठकीनंतर एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला आहे. तसंच आपण काळजीवाहू मुख्यमंत्री असल्यानं सर्वांची काळजी घेणार असल्याचं सूचक विधानही त्यांनी केलंय.


एकूणच काय दिल्लीतल्या बैठकीत मुख्यमंत्रीपदाचं नाव फायनल झाल्याची माहिती आहे.  केवळ औपचारीक घोषणा होणं बाकी असून भाजपच्या गटनेत्याच्या बैठकीनंतर त्यावर शिक्कामोर्तब होणार आहे...