लातूर :  लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील १२० इंटर्न डॉक्टरांनी राज्यातील डॉक्टरांच्या संपाला पाठिंबा दिलाय. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 'विद्या वेतनवाढी'साठी हे कामबंद आंदोलन सुरु केलंय. या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे. २०१५ साली शासनाने वेतनमान ६००० वरून वाढवून ११००० करण्याचे आश्वासन दिले होते, परंतु सलग पाठपुरावा करूनही वेतनमान वाढले नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'असोसिएशन ऑफ स्टेट मेडिकल इंटर्न्स'च्या प्रतिनिधींना या विषयावर तोडगा काढण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र मागील ३०-४० दिवसांपासून यावर निर्णय देण्यात आलेला नाही.


त्यामुळे नाईलाजास्तव संपूर्ण महाराष्ट्रातील इंटर्न डॉक्टरांनी १३ जूनपासून अनिश्चित कालीन संप पुकारलाय. तोगडा निघेपर्यंत हा संप सुरुच रहाणार आहे.