सातारा : जिल्ह्यात फलटणमध्ये झालेल्या संवाद मोळाव्यातच राष्ट्रवादी काँग्रेसमधला विसंवाद समोर आला आहे. या कार्यक्रमात शेखर गोरे आणि निंबाळकर समर्थक एकमेकांना भिडले. विशेष म्हणजे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या समोरच कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. त्यामुळे सातारा जिल्ह्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सारे काही आलबेल नसल्याचे समोर आले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संवाद कार्यक्रम सुरू झाल्यानंतर शेखर गोरे यांना मंचावर बोलवण्यात आलं. मात्र त्यांनी जाण्यास नकार दिला. राष्ट्रवादी काँग्रेसकडून गळचेपी होत असल्याचा आरोप यावेळी गोरेंनी केला. नंतर पवारांनी या कार्यक्रमातून काढता पाय घेतला. त्यानंतर पवार निंबाळकराच्या निवास्थानी रवाना झाले.


लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माढा लोकसभा मतदार संघातून शरद पवार यांनी आपली उमेदवारी जाहीर केल्यानंतर फलटणमध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता संवाद मेळावा घेण्यात आला. सातारा जिल्ह्यातील फलटण, कोरेगाव, माण आणि खटाव विधानसभेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने इथे उपस्थित होते. मात्र विजयसिंह मोहिते पाटील यांनी या कार्यक्रमाला दांडी मारली.