मुंबई : आयपीएलमध्ये (IPL 2021) पहिल्या स्थानावर असलेल्या महेंद्रसिंग धोणीच्या (MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) सामना दिल्ली कॅपिटल्सबरोबर (Delhi Capitals) खेळवला जात आहे. पण या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जमध्ये पहिल्यांदाच एक असं घडलं की ज्याची आयपीएलमध्ये चर्चा रंगली. धोणीने चेन्नईच्या प्लेईंग इलेव्हनमधून एका अशा खेळाडूला बाहेरचा रस्ता दाखवला जो 'यलो आर्माचा' (Yellow Army) एक महत्त्वाचा खेळाडू आहे. इतकंच नाही तर तो धोणीच्या खास मर्जीतला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा खेळाडू आहे सुरेश रैना (Suresh Raina), जो 'मिस्टर आयपीएल' म्हणून प्रसिद्ध आहे. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात सुरेश रैनाला डग आऊटमध्ये बसून सामना पाहावा लागत आहे. 


आयपीएलमध्ये रैनाची शानदार कामगिरी


आयपीएलमध्ये सुरेश रैनाची आतापर्यंतची कामगिरी शानदार आहे. आतापर्यंत झालेल्या आयपीएल स्पर्धेत रैना 205 सामने खेळलाआहे. यात त्याने 136.76च्या स्ट्राईक रेटने 5 हजार 528 धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रैना दुसऱ्या क्रमांकावर आहे.


धोणीने रैनाला दाखवला बाहेरचा रस्ता


सुरेश रैनासाठी आयपीएलचा चौदावा हंगाम मात्र काहीसा फ्लॉपच ठरला आहे. या हंगामात आतापर्यंत खेळलेल्या 12 सामन्यात 125 च्या स्ट्राईक रेटने रैनाने केवळ 160 धावा केल्या आहेत. यात एका अर्धशतकाचा समावेश आहे. पण त्याची कामगिरी सातत्यपूर्ण राहिली नव्हती. याच कारणामुळे धोणीने आपल्या मर्जीतल्या खेळाडूला प्लेईंग इलेव्हनमधून बाहेरचा रस्ता दाखवला.


रैनाच्या जागी या खेळाडूला मिळाली संधी


कॅप्टन कूल (Captain Cool) एमएस धोणीने (MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्सच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये सुरेश रैनाच्या जागी रॉबिन उथप्पला (Robin Uthappa) संधी दिली आहे. पण रॉबिन उथप्पाही या सामन्यात मोठी धावसंख्या करु शकला नाही. 19 चेंडूत त्याने केवळ 1 चौकार मारत 19 धावा केल्या. दिल्लीच्या आर अश्विने (R Ashwin) त्याला पॅव्हिलिअनचा रस्ता दाखवला.