कल्याण : आता बातमी पोलिसांवर झालेल्या हल्ल्याची. (attack on police) कल्याण जवळील आंबिवलीमधील ( Ambavili) इराणी (Iranians) वस्तीत एका आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर दगडफेक, त्यांच्या वाहनांवरही दगडफेक करण्यात आली. यामध्ये काही पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत तर पोलिसांच्या वाहनाचे नुकसान झाल्याची माहिती आहे. दरम्यान इराणी महिला पोलिसांच्या वाहनांसमोर ठिय्या धरून बसल्या होत्या आणि संबंधित आरोपी अद्यापही फरार आहे.  (Iranians attack on police at Kalyan, Three policemen injured)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कल्याणजवळील इराणी वस्तीत आरोपीला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांवर इराण्यांनी हल्ला केला. यावेळी साथीदाराची त्यांनी सुटका केली. मीरा भाईंदर क्राईम ब्रांचचे पोलीस पथक आरोपीला पकडण्यासाठी गेले होते. यावेळी हल्ल्यात तीन पोलीस जखमी झालेत. कल्याणजवळील इराणी वस्ती पोलिसांवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेने पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सराईत आरोपीला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांवर इराण्यांनी तुफान दगडफेक करत या आरोपीची सुटका केल्याचा प्रकार समोर आला आहे.


आंबविलीच्या इराणी वस्तीत एक सराईत गुन्हेगार पडकण्यासाठी हे पोलिसांचे पथक आले होते. या पथकाने संबंधित व्यक्तीला पकडले आणि गाडीत बसवून नेत होते. नेमक्या त्याच वेळेला रेल्वे फाटक बंद असल्याने पोलिसांच्या दोन्ही गाड्या तिकडे अडकून पडल्या. आणि हीच संधी साधत इराणी वस्तीतील महिला आणि तरुणांनी पोलिसांच्या गाड्यांवर तुफान दगडफेक सुरू केली. तर काही जणांनी बांबूच्या सहाय्याने गाड्यांवर हल्ला चढवला. अचानक झालेल्या या हल्ल्याने काही काळ पोलिसही बिथरून गेले  तर दोन गाड्यांपैकी एक गाडी कशीबशी तिथून दुसऱ्या मार्गाने निघून गेली. 



त्यामुळे नेमके ज्या गाडीमध्ये या आरोपीला ठेवण्यात आले होते तिच या लोकांच्या तावडीत सापडली. ज्यातून या इराण्यांनी संबंधित व्यक्तीला पोलिसांच्या तावडीतून खेचून बाहेर काढले आणि तिथून धूम ठोकल्याच समोर येत आहे. मीरा भाईंदर क्राईम ब्रांचेचे पथक होते. यात तीन पोलीस जखमी झालेत. कल्याणच्या खडपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


दरम्यान कल्याणच्या आंबविलीजवळील इराणी वस्ती आणि तिथली गुन्हेगारी पार्श्वभूमी काही नवीन नाही. याआधीही इकडे पोलिसांवर हल्ल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यात आणखी एका घटनेची भर पडली असून इराणी वस्तीतील लोकांची ही दहशत पोलीस विभाग आणखी किती काळ सहन करणार, या दहशतीला आणि थेट खाकी वर्दीवर हात टाकणाऱ्यांना सरकार आणखी किती पाठीशी घालणार हा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.