`इस बार चारसो पार` बोलून बोलून वेड लागण्याची वेळ?, रोहित पवारांनी शेअर केला व्हिडीओ
Rohit Pawar Share Video: राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे नेते रोहीत पवार यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केलाय.
Rohit Pawar Share Video: सध्या देशात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. राजकीय पक्षांनी आपल्या कार्यकर्त्यांना पक्षाचा अजेंडा दिला आहे. कार्यकर्ते हा अजेंडा तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवत आहेत. प्रत्येक पक्षाच्या स्वत:च्या घोषणा आहेत. या घोषणांनी कार्यकर्त्यांना उत्साह चढतो. अनेक कार्यकर्ते दिवसभर याच घोषणा देत असतात. पण सतत हाच विचार केल्याने याचे दुष्परिणामही जाणवू शकतात. याचीच प्रचिती देणारा एक कथित व्हिडीओ समोर आला आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे नेते रोहीत पवार यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केलाय. या कथित व्हिडीओमध्ये एक रुग्ण डॉक्टरकडे जाताना दिसत आहे. तो केवळ एकच वाक्य बोलतोय. 'इस बार चारसो पार' या वाक्याव्यतिरिक्त त्या रुग्णाला दुसरं काही बोलता येत नाहीय.
त्याच्या सोबत असलेला सोबती काही होणार नाही म्हणत त्याला दिलासा देतोय.
आधी हे अच्छे दिन आयेंगे असे म्हणायचे..आता हे इस बार चारसो पार असे म्हणत आहेत. दरम्यान डॉक्टर त्यांची नस तपासताना दिसत आहेत. त्यानंतर डॉक्टर रुग्णाला एक इंजेक्शन देतात. त्यानंतर हा रुग्ण शेवटचं 'इस बार चारसो पार' बोलून शांत होताना दिसतो..
काय आहे व्हिडीओत?
'झी 24 तास' या व्हिडीओच्या सत्यतेची खातरजमा करत नाही. दरम्यान रोहित पवारांनी हा व्हिडीओ शेअर करत विरोधकांवर टीका केलीय. 4 जून नंतर तुम्हाला भक्त अशा अवस्थेत दिसतील असे ते म्हणत आहेत. यावर अनेक प्रतिक्रियादेखील येत आहेत. काही लोक हा व्हिडीओ मुद्दाम बनवला असल्याची टीका करतायत.काहीजण व्हिडीओवरुन खिल्ली उडवतायत. तर काहीजण आपल्या पक्षाची काळजी करा असा सल्ला रोहित पवारांना देत आहेत.