योगेश खरे, झी २४ तास, नाशिक : मंदिरांची नगरी असलेल्या नाशिक शहरात गेल्या दोन आठवड्यापासून एक दिवसाआड खून होतोय. आज दुपारी पंचवटी परिसरात औरंगाबाद नाक्या जवळ पुन्हा एक सशस्त्र हल्ला करण्यात आलाय.  त्यामुळे पुन्हा एकदा नाशिक शहरातल्या कुठलाही परिसर गुन्हेगारीमुक्त राहिलेला नाही  हे सिद्ध झालेय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज विजय नगर कॉलनीतील देवी मंदिराजवळ दीपक डावरे या तरुणावर  प्राणघातक हल्ला करण्यात आला. बावीस वर्षीय दीपक हा युवक मैदानात क्रिकेट खेळत होता. त्यावेळी सदाशिव झाबरे व त्याच्यासोबत काही गुंडांची टोळी मैदानावर आले. त्यांनी दीपकशी बाचाबाची करत शिवीगाळ केली. त्यावेळी इतर सर्व खेळाडू यांनी त्यांच्या बचावाचा प्रयत्न केला मात्र चाकु सुरे काढताच धारदार शस्त्राने दीपकवर हल्ला केला. या हल्ल्यात दीपक डावरे याचा पोटातील कोथळा बाहेर आलाय. प्रकृती अतिशय गंभीर असून त्याच्यावर सध्या नाशिकच्या खाजगी रुगणालायत उपचार सुरू आहेत .


गेल्या 17 दिवसापासून आतापर्यंत सात खून झाले आहेत. किरकोळ वादातून वा कोटुंबिटक कारणातून या घटना घडत आहेत. पोलिसांना तरुण घाबरत नाहीत असे चित्र आहे. अल्पवयीन मुले गुन्हेगारीत सक्रिय झाल्याने अधिक चिंता वाढलीये. त्यात नवनियुक्त नाशिक पोलीस आयुक्तांचा वचक नाहीसा झाल्यानं गेल्या पंधरा दिवसापासून गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. त्यामुळेच विविध प्रकारच्या घटना सातत्याने समोर येत आहेत नागरिकांच्या सहभागाने कायदा स्यव्यस्था नियंत्रित करण्याची गरज आहे, अन्यथा येत्या दिवसात नाशिक गुन्हेगारांची राजधानी ठरेल हे निश्चित.