राज्यातील एका जोडप्याचं ISIS संबंध, NIAच्या सर्च ऑपरेशनमधून धक्कादायक गोष्ट समोर
NIAच्या सर्च ऑपरेशनमधून धक्कादायक गोष्ट समोर, राज्यातील एका जोडप्यावर ISIS सोबत संबंध असल्याचा आरोप
पुणे : एक धक्कायदायक बातमी समोर येत आहे. पुण्यातील एका जोडप्यावर आयसीसशी संबंध असल्याचा आरोप लावण्यात आला आहे. पुण्यातील एका दाम्पत्याचा आयसीससोबत लिंक असल्याचं चौकशीत समोर आलं आहे. एनआयएने पुण्यातील कोंढवा परिसरात संशयिताच्या घराची झडती घेतली. यानंतर पोलिसांनी संशयित जोडप्याला 8 मार्च 2020 रोजी अटक केली आहे.
सध्या संबंधित प्रकरणाचा तपास NIA ने घेतला. NIA मंगळवारी एका संशयिताच्या घराची झडती घेतली. पुणे शहरातील कोंढवा भागात, दोन वर्षांपूर्वी एका काश्मिरी जोडप्याला इस्लामिक स्टेट-खोरासान प्रांत (IS-KP), इस्लामिक स्टेट (IS) च्या अफगाणिस्तान-आधारित गटाशी संबंध असल्याबद्दल अटक केल्याची माहिती समोर आली.
नंतर या प्रकरणाचा तपास NIA ने ताब्यात घेतला. आता याप्रकरणी पुढे काय होतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.