मुंबई : सध्याच्या राजकीय स्थितीचे गणित पाहाता काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी कोणतंही सरकार बनवणं अशक्य असल्याचे म्हणत काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी घरचा आहेर दिला आहे. सत्तास्थापनेसाठी आम्हाला शिवसेनेची मदत लागेल. मात्र या अडचणीच्यावेळी शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्याचा विचार आम्ही करू शकत नाही. जर तसं केलं तर तो निर्णय पक्षासाठी धोकादायक ठरेल असे संजय निरुपम यांनी ट्विट केले आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्रात सर्वात जास्त जागा जिंकणाऱ्या भाजपाला राज्यपालांनी सरकार बनविण्याचे आमंत्रण दिले. शिवसेनाशिवाय १०५ आमदारांसोबत असलेल्या भाजपाला बहुमत मिळवण्यासाठी करण्यासाठी १४५ चा आकडा पार करावा लागणार आहे. अशावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एकत्र येऊन सत्ता स्थापन करु शकते आणि काँग्रेस त्यांना बाहेरुन पाठींबा देईल अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.



'सत्तास्थापनेसाठी बोलवाव'



राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येऊन सरकार स्थापन करावे अशी इच्छा मिलिंद देवरा यांनी व्यक्त केली. दोन्ही पक्षांचे आमदार मिळून बहुमत मिळणार नाही, यावर देखील त्यांना प्रश्न विचारण्यात आला. महाराष्ट्राच्या राज्यपालांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सत्तास्थापनेचे निमंत्रण द्यायला हवे. कारण भाजपा-शिवसेनेने एकत्र सत्ता स्थापन करण्याचे नाकारले आहे. अशावेळी एनसीपी आणि काँग्रेस राज्यात दुसरी मोठी आघाडी असल्याचे ते म्हणाले.