मोठी बातमी । हिरानंदानी ग्रुपवर आयकर विभागाचे छापे
IT Raid in Thane : ठाणे येथील हिरानंदानी ग्रुपवर आयकर विभागाचे छापे मारले आहेत.
ठाणे / मुंबई : IT Raid in Thane : ठाणे येथील हिरानंदानी ग्रुपवर आयकर विभागाचे छापे मारले आहेत. मुंबई, बंगळूरू आणि चेन्नईसह देशभरात छापेमारी आयकर विभागाकडून सुरु आहे.
बांधकाम क्षेत्रात हिरानंदानी बिल्डर्स हे एक मोठं नाव आहे. आज सकाळपासूनच हिरानंदानी यांच्या ठाणे येथील सेल्स कार्यालयावर आयकर विभागाची छापेमारी सुरू झाली आहे. काही तास उलटून गेले आहेत तरी देखील ही छापेमारी सुरूच आहे.
ठाणे परिसरातील पातलीपाडा या परिसरामध्ये शेकडो एकर परिसरामध्ये हिरानंदानी ग्रुपने आपले बांधकाम केलेल आहे. मुंबई, बंगळूरू आणि चेन्नई या ठिकाणांवरील हिरानंदानी ग्रुपच्या कार्यालयावर आयकर विभागाची छापेमारी सुरू आहे. या एकूण छापेमारीमध्ये हिरानंदानी ग्रुपच्या विरोधात नेमके काय सापडले यांची माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही.
कुर्ला येथे ईडीची छापेमारी
तर दुसरीकडे कुर्ला येथील गोवावला कंपाउंड परिसरात ईडी अधिकारी अॅक्शनमध्ये आहे. ( ED Raid in Mumbai) सध्या ईडीचे अधिकारी संपूर्ण चौकशी करत आहेत. या परिसरातील प्रत्येक दुकानात जाऊन चौकशी करत आहेत. हे दुकान कधी कोणी खरेदी केली किंवा या खरेदीमधील व्यवहार काय आहे ही संपूर्ण चौकशी सुरु आहे. काही वृद्ध तक्रारदार या चौकशीत अधिकाऱ्यांसोबत असल्याचे दिसत आहे. कंपाउंड परिसरातील स्वीटसचे शॉप, पान शॉप, टायर शॉपमध्ये जाऊन अधिकाऱ्यांनी तपासणी केली.
मंत्री नवाब मलिक याना याच गोवावाला कंपाऊंडमधील जमीन गैरव्यवहार प्रकरणी अटक झाली आहे आणि याच अनुषंगाने येथे तपास सुरू आहे.