पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तियांवर सलग दुसऱ्या दिवशी छापेमारी सुरू आहे. अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या मुंबईतल्या ऑफिसवर सलग दुसऱ्या दिवशी छापेमारी सुरू आहे. पुण्यात अजित पवारांच्या दोन बहिणी राहतात. त्यांच्या घरांवरही छापेसत्र सुरूच आहे. पंचवटी सोसायटीत रजनी इंदूलकर आणि मोदी बागेत नीता पाटील यांच्या घरांवर छापे सत्र सुरू आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोल्हापुरात काल अजित पवारांची बहिण विजया पाटील यांच्या मुक्ता पब्लिकेशन हाऊसवर छापा घालण्यात आला. तिथे अजूनही छापेसत्र सुरू आहे. साताऱ्यात जरंडेश्वर सहकारी कारखान्यातही छापेसत्र सुरू आहे. त्याशिवाय अहमदनगरमध्ये अंबालिका साखर कारखाना, बारामतीत सायबर डायनॅमिक्स डेअरी, दौंड साखर कारखाना इथेही छापेसत्र सुरू आहे. याशिवाय आज सकाळी नंदूरबारमध्ये आयन मल्टीट्रेड साखर कारखान्यावर आयकर विभागाने कारवाई केलीय. 


राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रस्त्यावर


त्यानंतर आता अजित पवार यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरले आहेत. पुण्यात काऊन्सिल हॉलबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार आणि भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसंच We Support Ajit Dada अशा समर्थनार्थ घोषणा दिल्या जात आहेत. 


पिंपरी चिंचवड मध्येही राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत आयकर विभाग आणि केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आम्ही अजित पवार यांच्या बरोबर आहोत आणि राहणार असे फलक घेऊन कार्यकर्त्यांनी पिंपरी चौकात आंदोलन केलं. 


लवकरच दूध का दूध, पानी का पानी


अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. लवकरच दूध का दूध, पानी का पानी, करु असे अजित पवार म्हणाले. पार्थ पवार यांच्यासह अजित पवार यांच्या निकटवर्तीयांवर दुसऱ्या दिवशीही आयकर विभागाच्या अधिकारी छापे टाकले. पाहुणे घरी आहेत, ते गेल्यावर माझी भूमिका मांडेन. नियमाने जे असेल ते समोर येईल. घाबरायचं कारण काय? आयटी छाप्यांनंतर, अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, लवकरच दूध का दूध पानी का पानी आपण करणार आहोत, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.