सोनू भिडे, नाशिक: अंधश्रद्धेपोटी नागरिक काय करतील याचा भरवसा नाही. याच्या अनेक घटना आता पर्यत उघडकीस आल्या आहेत. अशीच एक घटना नाशिक जिल्ह्यात घडली आहे. बायकोला बर वाटत नाही म्हणून चक्क नवऱ्याने घरात गिधाडाचे पाय आणि डोक बांधून ठेवल्याच समोर आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय होता प्रकार 


दत्तू हेमा मौळे यांची बायको गेल्या बऱ्याच दिवसांपासून आजारी आहे. तिला भुताने झपाटले असल्याचा संशय दत्तूला आला होता. त्याने याकरिता भोंदू बाबाचा सल्ला घेतला. या भोंदू बाबाने त्याला अजब सल्ला दिलाय. तुझ्या घरात भूत आहेत. याचा परिमाण तुझ्या बायकोबर होऊ शकतो. हे टाळायचे असेल तर तू घरात गिधाडाचे पाय आणि डोक लटकून ठेव असा सल्ला या भोंदू बाबाने दत्तूला दिला. आणि मग काय दत्तूने भोंदू बाबाने दिलेला सल्ला मानून घरात गिधाडाचे पाय आणि डोके घरात टांगून ठेवले. 


असे झाले उघड


बिबट्याची शिकार करून त्याच्या कातडीची तस्करी करणाऱ्या टोळीला इगतपुरी वन विभागाने अटक केली होती. यात गावातील माजी सरपंच सुद्धा होता. घटनेची चौकशी करत असताना सदर प्रकार उघडकीस आला. अंधश्रद्धेपोटी भोंदू बाबाच्या सांगण्यावरून गिधाडाची शिकार केल्याची कबुली संशयित आरोपी दत्तू मौळे याने दिली. यानंतर वन विभागाने दत्तूच्या इगतपुरी तालुक्यातील मोखाडा येथील त्याच्या घराची झडती घेतली असता त्याच्या घरात गिधाडाचे पाय आणि डोक खुंटीला टांगून ठेवलेल्या अवस्थेत मिळून आले. 


“अंधश्रद्धा निर्मूलन समिती” चे आवाहन 


"प्राणी व पक्षी याबाबत माणसांमध्ये प्रचंड अंधश्रद्धा आहे.कासव,सर्फ,मांडुळ,घोरपड,घुबड यांबरोबर गिधाडाचा जादूटोणा,भुतबाधा किंवा इतर अंधश्रद्धांत वापर केला जातो. सदरच्या प्रकरणात भूतबाधा होऊ नये म्हणून मृत गिधाडाचे अवशेष घरात टांगले होते. आपल्याकडे वन्यजीव संरक्षण कायदा आहे. शिवाय गिधाड हे नष्टप्राय होण्याच्या मार्गावर आहे.त्यांचे संरक्षण झाले पाहिजे. याच्या विपरीत भुतबाधेसाठी त्याला मारणे, ही निखालस पणे अंधश्रद्धा आहे."


जादूटोणाला नागरिक मोठ्या प्रमाणात बळी पडत आहेत. याचा फायदा तस्करी करणारे गुन्हेगार घेत आहेत. यामुळे प्राण्याची शिकार मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आता गरज आहे ती वन विभागाने यासंदर्भात कडक निर्बंध लावण्याची....