J J arts college:  जे. जे. कला महाविद्यालयासह जे. जे उपयोजित कला महाविद्यालय आणि जे. जे. वास्तुकला महाविद्यालय  या तीन कॉलेजांचे मिळून आता डी-नोव्हो प्रकारातंर्गत अभिमत विद्यापीठ स्थापन करण्यात आले आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी याची  अधिकृत घोषणा  केली आहे. महाविद्यालयास अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळवून देण्यासाठी सरकारने केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतील सर जे.जे. कला महाविद्यालय, उपयोजित कला महाविद्यालय आणि वास्तुशास्त्र महाविद्यालय या तीन कॉलेजांचे मिळून आता डी-नोव्हो प्रकारातंर्गत अभिमत विद्यापीठ ( डीम्ड विद्यापीठ )  स्थापनेची अधिकृत घोषणा केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास मंत्री धर्मेंद्र  प्रधान यांनी केली. 


प्रधान यांनी केंद्र सरकारच्या जे जे स्कूल ऑफ आर्ट्सला अभिमत विद्यापीठ घोषित करण्याचा पत्र देखील राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे सुपूर्द केला आहे. या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी  जे.जे. स्कूल ऑफ आर्ट कॅम्पसला भेट दिली. 


सर ज.जी. कला, वस्तुकला आणि उपयोजित कला महाविद्यालयातील प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले आहे.  या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर ,  उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, मुंबई शहर पालकमंत्री दीपक केसरकर आणि इतर अनेक मान्यवर देखील उपस्थित होते. 


जे. जे. कला महाविद्यालय, उपयोजित महाविद्यालय आणि वास्तुकला महाविद्यालयाचे अभिमत महाविद्यालयात रूपांतरण करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (यूजीसी) तत्वतः मंजुरी मिळाली. यूजीसीच्या अटी, शर्तींची पूर्तता केल्यानंतर जे. जे. महाविद्यालयाला अभिमत विद्यापीठाचा दर्जा प्राप्त होण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यासाठी सरकारने सल्लागाराची नियुक्ती केली होती. अखेर सरकारच्या प्रयत्नांना यश आले आहे. 


नव्या संसद भवनासारखंच लवकरच राज्यालाही नवं विधान भवन मिळणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तसे संकेत दिले आहेत. विधान भवनाची नवी वास्तू उभारण्याचं सरकारच्या विचाराधीन असल्याचं जे जे स्कूल ऑफ आर्टच्या एका कार्यक्रमात त्यांनी सांगितलं.