J.J.Hospital Mumbai येथे खास पाहुण्यांना लसीकरण झाल्याचं समोर आले आहे. वयोगटात बसणाऱ्या तरूणांना लस दिल्याची माहिती मिळतेय. मात्र त्यांची नोंदणी अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी म्हणून केली जात असल्याची माहिती आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1 मार्चपासून जे.जे. रुग्णालयात लसीकरणासाठी येणाऱ्या ‘खास पाहुण्यां’ची गर्दी वाढायला लागली आहे. यात आत्तापर्यत अनेक मंत्री, राजकीय नेते लस घेण्यासाठी येऊन गेले आहेत अशी माहिती समजतेय.


खास पाहुणे म्हणून मालिकांमधील अभिनेत्यांसह अनेक तरुण मंडळीही लस घेण्यासाठी जे.जे.मध्ये हजेरी लावत असल्याचे निदर्शनास येत आहे. ‘खास पाहुण्यां’ची गर्दी वाढली असून यातील काही जणांची कोव्हॅक्सिनची मागणी असते.


त्यामुळे शुक्रवार असूनही कोव्हॅक्सिनचे केंद्र खास पाहुण्यांसाठी खुले ठेवले होते असंही समजतंय. मात्र वयोगटात न बसणाऱ्या कोणाचेही लसीकरण केलेले नाही, असं सांगत जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रणजित माणकेश्वार यांनी हे आरोप नाकारले आहे