लाचखोर अभियंत्याला सक्तमजुरीची शिक्षा
लाचखोर अभियंत्याला ८५ लाखांच्या दंडासह १० वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा.
अहमदनगर : अहमदनगरमधल्या लाचखोर अभियंत्याला ८५ लाखांच्या दंडासह १० वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. श्रीरामपूर पंचायत समितीचा शाखा अभियंता अशोक मुंढे याला श्रीरामपूर सत्र न्यायालयानं ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. रस्त्याच्या कामांची बिलं काढण्यासाठी ठेकेदाराकडून अशोक मुंढे यानं लाच स्विकारली होती. लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये देण्यात आलेला हा महत्वपूर्ण निकाल ठरला आहे.