COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नितेश महाजन, झी मीडिया, जालना : जालन्यात नगरपालिकेच्या वतीने शहरातील नागरी सुविधा कामांचा उदघाटन सोहळा पार पडला. शिवसेनेचे माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर मात्र कार्यक्रम पत्रिकेत नाव नसल्यानं या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिले नाहीत. या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पालकमंत्री राजेश टोपे, आमदार कैलास गोरंटयाल यांनी प्रमुख उपस्थिती होती. त्यामुळे या कार्यक्रमात राष्ट्रवादी, काँग्रेस आणि भाजप एकत्रित आल्याचं चित्र पाहायला मिळालं.


या कार्यक्रमा दरम्यान केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी खोतकर यांचं नाव न घेता त्यांना टोला हाणला. नगराध्यक्षांनी 'तुमच्या तिघांच्या सहकार्याने पालिकेचा कारभार चांगला चालविन' असा उल्लेख केला. हाच धागा पकडत दानवे यांनी राज्यसरकार मधील तिघांपैकी आपण नाही, असं सांगत तीन जणांमध्ये मलाही चौथा म्हणून घ्यायला हवं होतं असं सांगितलं.



दरम्यान नगराध्यक्षांनी राज्य सरकारमधील तिघे नाही तर स्थानिक म्हणून तिसरे तुम्हीच असं सांगीतल्यानं दानवेंनी स्मित हास्य करून खोतकरांना एकप्रकारचा टोला हाणला.


शिवाय काँग्रेस आमदार कैलास गोरंटयाल यांना मला सांभाळून घ्या, अशी स्मितहास्य करत विनवणी केल्यानं उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला.