जालना : जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यात देखील जोरदार गारपीट झाली. या गारपिटीमुळे मंठा शहरासह तालुक्याला काश्मीरच रूप आलं होतं. मंठा तालुक्यात सकाळी 6 वाजेच्या सुमारास गारपिटीचा फटका बसला. 


पिकांची मोठ्या प्रमाणावर नासाडी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यामुळे तालुक्यातील हरभरा, गहू या पिकांबरोबरच अन्य पिके जमिनीवर अक्षरशः आडवी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. मंठा तालुक्यातील जवळपास सर्वच गावात गारपिटीने थैमान घातलं. त्यामुळे पिकांची मोठ्या प्रमाणावर नासाडी झाली. 


गारांचा खच पडल्याने पिकं उध्वस्त


काढणीला आलेली पिकं उध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरं जावं लागतंय. गारपिटीमुळे रस्त्यासह प्रत्येक शेतकऱ्यांच्या पिकात गारांचा खच पडल्याने पिकं उध्वस्त झालीत.