जयेश जगड, झी मीडिया, अकोला :कौटुंबिक वादातून एका व्यक्तीचा पाण्याच्या टाकीवर चढून शोले आंदोलन केल्याचे पाहायला मिळाले. दुपारी एक व्यक्ती अकोला न्यायालयासमोर बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीवर अचानक चढला आणि बघता बघता नागरिकांची गर्दी जमायला लागली. काही वेळात पोलीस ही घटनास्थळी पोहचले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


रागाच्या भरात हा तरुण टाकीवर चढला खरा पण उतरताना जीव गळ्यापर्यंत आला. त्यावेळी त्याला आयुष्याचं महत्व जाणवू लागलं. राजेश अमृतकर असे या युवकाचे नाव असून त्यावर सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.



सुरुवातीला राजेश अमृतकरशी संवाद साधण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. मात्र हा राजेश कोणताही प्रतिसाद देत नव्हता. माझ्या परिवाराला मी गेल्यावर कळेल हा एकच शब्द तो बोलत होता. त्यामुळे कौटुंबिक वाद असल्याचं समोर आलं.



पोलिसांनी टाकीवर जाण्याचा प्रयत्न केला मात्र कुणी वर आलं तर उडी मारण्याची धमकी या राजेशने दिली. अनेक तासांनंतर राजेशने गळफास घेऊन उडी मारली. मात्र लगेचंच त्याच्या आपली चूक लक्षात आली आणि जीवनाचे महत्व कळाले. त्यानंतर राजेश बचावासाठी विनंती करू लागला. देव बलवत्तर म्हणून दोरी तुटली आणि राजेश थोडक्यात बचावला.