मुंबई : विशिष्ट भौगोलिक ओळख असलेल्या म्हणजेच जीआय टॅग असलेल्या भारतातील जळगावमधील केळींना दुबईला निर्यात केल्याची माहिती वाणिज्य मंत्रालयाने बुधवारी दिली. जीआय टॅग उत्पादकांना उत्पादनाची प्रीमियम किंमत मिळवूण देण्यात मदत करतो, कारण त्यांच्या सारख्या असणाऱ्या वस्तूंच्या मार्केटींगसाठी कोणताही अन्य उत्पादक किंवा निर्माता नावाचा दुरुपयोग करू शकत नाही. जीआय टॅग एका विशिष्ट भौगोलिक क्षेत्रापासून उद्भवणार्‍या शेती, नैसर्गिक किंवा उत्पादित उत्पादनांसाठी वापरला जातो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरेतर हे टॅग वस्तूची गुणवत्ता आणि विशिष्टतेचे आश्वासन देते, जे मुख्यता त्यांच्या मूळ स्थानकाच्या उत्पादनामुळे मिळते.


जळगाव जिल्ह्यामधील रावेर तालुक्यातील  तांदळवाडी  गावातील शेतकऱ्यांच्या केळींना शासनाने जीआय टॅग दिले आहे. त्यानंतर या जळगावच्या जीआय टॅग केळींना विदेशात निर्यांत करण्यात आले. ज्याची चटक दुबईला लागली.  त्यामुळे गेल्यावर्षी तांदळवाडीतील केळीचीं दुबईला  20 मेट्रिक टन निर्यात करण्यात आली आहे. त्यांची किंमत जवळजवळ 600 कोटी आहे.


दार्जिलिंग चहा, तिरुपती लाडू, कांग्रा पेंटिंग, नागपूर नारंगी आणि काश्मीर पश्मीना यांची भारतातील जीआय उत्पादनांमध्ये नोंद आहे.


मंत्रालयाने म्हटले आहे की, 2020-21 या वर्षात भारताने 619 कोटी रुपयांच्या 1.91 लाख टन केळीची निर्यात केली आहे. त्यात म्हटले आहे की, "महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील तांदळवाडी गावच्या प्रगतीशील शेतकऱ्यांकडून तब्बल 22 टन जीआय-टॅग जळगाव केळी खरेदी केली गेली. हे क्षेत्र कृषी निर्यात धोरणांतर्गत केळीचे क्षेत्र म्हणून ओळखले गेले."


जळगाव केळीला 2016 मध्ये जीआय टॅग मिळाले


सन 2016 मध्ये जळगाव केळीला जीआय टॅग मिळाले. केळीच्या एकूण उत्पादनात सुमारे 25 टक्के वाटा असलेला भारत हा जगातील केळीचा प्रमुख उत्पादक देश आहे. केळीच्या उत्पादनात आंध्र प्रदेश, गुजरात, तामिळनाडू, महाराष्ट्र, केरळ, उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेश यांचा 70 टक्केपेक्षा जास्त वाटा आहे.