वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव : कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आणि ऑक्सिजन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर जळगावातील संजीवन रुग्णालयातील डॉक्टर उदय पाटील यांनी बेन सर्किट (Ben Circuit)नावाची एक प्रणाली बनवली आहे. या किटमुळे रुग्णाला जवळपास पन्नास टक्के ऑक्सिजन कमी लागतो तसेच या बेन सर्किटमुळे रुग्णांचे ऑक्सीजन सॅच्युरेशन (Oxygen Saturation) वाढण्यास देखील मदत होते असा दावा त्यांनी केला आहे. आतापर्यंत त्यांच्या रुग्णालयातील अनेक कोरोनाबधित रुग्णांवर या किट चा वापर करण्यात आला असून याचा अनेक रुग्णांना लाभ झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाचा हाहाकार माजला असतांना ऑक्सिजनचा तुटवडा देखील मोठ्या प्रमाणात भासू लागला आहे. सगळीकडे ऑक्सिजनचा शॉर्टेज (Oxygen Shortage) सुरू असल्याने प्राणवायू निर्मिती वा उपलब्धतेकडे सर्वांची धाव असल्याचे दिसून येत आहे. 


जळगावातील डॉ. उदय पाटील यांनी बेन सर्किट नावाची एक प्रणाली बनवली आहे. या माध्यमातून रुग्णाला लागणाऱ्या एकूण ऑक्सिजनपैकी अर्धा ऑक्सिजन लागत असून ऑक्सिजनची बचत होण्यास मदत होत आहे. 



या सर्किट मुळे रुग्णाचे ऑक्सिजन सॅच्युरेशन देखील आहे. स्वतः डॉ उदय पाटील आपल्या रुग्णालयात 8 दिवसांपासून या प्रणालीचा वापर करत आहेत.


डॉ. उदय पाटील हे स्वतः भुलतज्ञ आहेत त्यांना कोरोना झाल्यानंतर त्यांना या बेन सर्किटची कल्पना सुचली. या सर्किट मुळे मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन ची बचत होत असून उरलेला ऑक्सिजन हा इतर गरजू रुग्णांना वापरल्याने त्यांचे देखील प्राण वाचण्यास मदत होते. तसेच या बेन सर्किट ची किंमत खूप कमी असल्याने रुग्णांना अधिक परवडू शकते. आणि रुग्णालय आणि रुग्ण अशा दोघांच्याही पैशात बचत होत असल्याची माहिती डॉ, उदय पाटील यांनी दिली आहे.


या ठिकाणी एक मध्य प्रदेश राहणाऱ्या तरुणीवर याच सर्किट च्या माध्यमातून उपचार सुरू असून गेल्या महिन्याभरापासून ती या रुग्णालयात आज. अनेक ठिकाणी औषध उपचार केले  पण फरक पडला नाही मात्र या ठिकाणी आल्यानंतर मला खूप बर वाटत आहे. आणि मी नक्कीच बरी होणार अशी मला खात्री आहे असे कोरोना पॉझिटीव्ह असलेल्या मीनाक्षी राठोड यांनी सांगितले. 


बेन सर्किटची मदतीने नेहमीपेक्षा लागणार्‍या निम्मे ऑक्सीजनमध्येच रूग्णाची सॅच्युरेशन लेव्हल वाढत असल्याचे त्यांनी सिध्द केले आहे. यामुळे आता कमीत कमी ऑक्सीजनचा वापर करून दर्जेदार उपचारासाठी बेन सर्कीट हे वरदान ठरू शकते. 


या सर्किट चा वापर जर रुग्णालयांमध्ये केला गेला तर नक्कीच आपण ऑक्सिजनच्या तुटवड्यावर मात करू शकतो असं मत डॉक्टर उदय पाटील यांनी व्यक्त केला आहे. आतापर्यंत संजीवन रुग्णालयातील पाच रुग्णांवर या सर्किट चा वापर करण्यात आला असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचे दिसून आली असल्याची माहिती रुग्णांच्या नातेवाईकांनी दिली आहे.