COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जळगाव : जळगावात एका भावानं आपल्या नवविवाहित बहिणीला चक्क हेलिकॉप्टरमधून माहेरी आणलंय. सोशल मीडियावर या व्हिडिओची प्रचंड चर्चा होतेय. जळगावातल्या शिवानी अशोक कावडिया हिचं लग्न परळी वैजनाथमधल्या प्रथितयश जैन कुटुंबातल्या डॉ. कुणाल यांच्यासोबत नुकताच संपन्न झाला होता. प्रथेप्रमाणं लग्नानंतर शिवानीला काही दिवस माहेरी जायचं होतं. तिला नेहण्यासाठी तिचा लाडका भाऊ येणार होता. 


विराजनं आपल्या बहिणीचं जरा हटके स्वागत करायचं ठरवलं. त्यामुळे त्यानं बहिणीला हेलिकॉप्टरनं आणण्याचा  इरादा केला. त्यानुसार परळी इथं विराज हेलिकॉप्टरनं पोहोचला. आपल्याला घेण्यासाठी विराज हेलिकॉप्टर घेऊन आला याचा सुखद धक्का शिवानीला बसला. 



बघता बघता गावात बातमी वाऱ्यासारखी पसरली. हेलिकॉप्टर पाहण्यासाठी गावातील लोकांची एकच झुंबड उडाली. हे हेलिकॉप्टर जळगावमधल्या कै. बॅरिस्टर निकम चौक मैदानावर उतरविण्यात आलं होतं. शिवानीचं माहेरी झालेलं भव्य स्वागत पाहून ती चांगलीच भारावून गेली होती. सध्या सोशल मीडियावर याच व्हिडिओची चर्चा दिसून येतेय.