मुंबई : जळगाव जिल्ह्यातील चोपडा विधानसभा मतदार संघाच्या (Chopda Assembly Constituency) शिवसेना पक्षाच्या महिला आमदार लता सोनवणे (Mla Lata Sonwane Corona) यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबतची माहिती लता सोनवणे यांचे पती चंद्रकांत सोनवणे (Mla Lata Sonwane Husband) यांनी दिली आहे. (Jalgaon Chopda Assembly Constituency Mla Lata Sonwane Tested Corona Positive Before Winter Session of Maharashtra Assembaly) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात उद्यापासून म्हणजेच 22 डिसेंबरपासून विधिमंडळाचं अधिवेशन सुरु होत आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून सर्व सदस्यांना कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली. त्यामुळे लता सोनवणे यांनी आरटीपीसीआर टेस्ट केली. मात्र दुर्देवाने त्यांना कोरोना असल्याचं निदान झालं.


आता टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने लता सोनवणे यांना या अधिवेशनाला उपस्थित राहता येणार नाही. तसेच त्यांच्यावर घरच्या घरीच उपचार होणार आहेत.    


दरम्यान विधीमंडळाचं हे अधिवेशन एक आठवड्याचं असणार आहे . या दरम्यान विरोधी पक्ष राज्यातील विविध मुद्द्यांवरुन घेरण्याच्या तयारीत आहेत. 


या अधिवेशनात एकूण 26 विधेयकांवर चर्चा होणार आहे. यामध्ये 5  प्रलंबित विधेयकं आणि प्रस्तावित 21 विधेयकं अशी एकूण 26 विधेयकं आणि अध्यादेश यांचा समावेश आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.