Jalgaon Crime: एका हत्येच्या घटनेने जळगावातील जामनेर तालुका हादरलाय. अवघ्या 6 वर्षाच्या मुलीची या घटनेत हत्या करण्यात आली आहे. या प्रकारामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. कसा घडला हा प्रकार? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

6 वर्षाची चिमुकली घरात एकटी होती हे पाहून आरोपी घरात घुसला. त्याने मुलीला तुला खाऊ घेऊन देतो, असे आमिष दाखवले. यानंतर तो मुलीला घेऊन गावा शेजारीच असलेल्या शेतात गेला. येथे त्याने 6 वर्षाच्या मुलीचा निर्घृण खून केला. यामुळे आजुबाजूचा परिसर हादरला. 


चिचखेडे बुद्रुक गावाजवळची घटना


जामनेर तालुक्यातील केकतनिंभोरा शिवारातील चिचखेडे बुद्रुक गावाजवळ ही घटना घडली. संध्याकाळच्या सुमारास आजुबाजूला कोणी नाही हे पाहून आरोपीने मुलीची हत्या केली.


 300 ते 400 नागरिकांचा जमाव 


दरम्यान पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीला ताब्यात घेतले आहे. यानंतर जामनेर पोलीस स्थानकासमोर 300 ते 400 नागरिकांचा जमाव जमला होता. या संतप्त जमावाने पोलिसांकडे त्या आरोपीला जमावाच्या स्वाधीन करण्याची मागणी केली होती. मात्र मागणी मान्य न झाल्यामुळे या नागरिकांनी पोलीस स्थानकासमोरील रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करत जाळपोळ सुरू केली. 


दगडफेकीमध्ये 15 पोलीस कर्मचारी जखमी 


पोलिसांनी जमावाला शांतता ठेवण्याचे आवाहन केल्यानंतर संतप्त जमावाने जामनेर पोलीस स्थानकावर दगडफेक करायला सुरुवात केली. त्या दगडफेकी मध्ये 15 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यापैकी 6 कर्मचाऱ्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.