जळगाव  : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून भिजवणारा पाऊस सुरु असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केलं जातंय. जोरदार पावसाची प्रतीक्षा असल्याने जिल्ह्यातील बहुतांशी धरणांमध्ये मात्र अजून पुरेसा पाणीसाठा साचलेला नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध्यप्रदेशात पडणाऱ्या पावसामुळे तापी नदीवरील हतनूर धरणाचे २० दरवाजे उघडण्यात आले असून १३ हजार ७५५ क्यूसेस पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आलाय. 


गिरणा धरणात ४१ टक्के तर वाघूर धरणात ६४ टक्के पाणीसाठा निर्माण झालाय. दरम्यान, संततधार पाऊस पडत असल्याने खरिपाची पिके चांगलीच तरारली आहेत.