जळगाव महापौरांचा तडकाफडकी राजीनामा आणि रडू कोसळले
माजी मंत्री सुरेश जैन यांच्या आदेशानंतर जळगाव महापालिकेचे महापौर नितीन लढ्ढा यांना तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागलाय.
जळगाव : माजी मंत्री सुरेश जैन यांच्या आदेशानंतर जळगाव महापालिकेचे महापौर नितीन लढ्ढा यांना तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागलाय.
राजीनामा दिल्यानंतर प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधीकारी किशोर राजेनिंबाळकर यांच्या दालनात महापौर लढ्ढा यांना रडू कोसळलं. यावेळी त्यांच्या समर्थकांनी त्यांना सावरलं.
महापालिकेत मनसेच्या पाठिंब्यावर सुरेश जैन प्रणित खान्देश विकास आघाडीची सत्ता असून जैन ठरवितात तेच महापालिकेच्या राजकारणात घडतं हा आजवरचा अनुभव आहे. महापौरांच्या राजीनाम्यानंतर पुन्हा याबाबत चर्चा रंगलीय.
दरम्यान राजीनामा देण्यामागे कोणताही दबाव नव्हता एक राजकीय प्रक्रियेचा भाग असल्याचं लढ्ढा यांनी यावेळी सांगितलं.