जळगाव : महिला सरपंचाला राग अनावर झाल्यामुळे त्यांनी धक्कादायक पाऊल उचललं आहे. महिला सरपंचाने चक्क एका नागरिकाला मोबाईल फेकून मारला. जळगावच्या मुक्ताईनगरमधील वडोदा ग्रामपंचायतीमध्ये सरपंच आणि उपसरपंचामध्ये राडा झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी संतापलेल्या महिला सरपंचानं रागाच्या भरात चक्क उपसरपंचाला मोबाईल फेकून मारला. वडोदा ग्रामपंचायत अंतर्गत गावात अनेक समस्या असल्यानं मासिक मीटिंग घेण्यात आली यात महिला सरपंच आणि उपसरपंच यांच्यात विकास कामावरून बाचाबाची झाली. 



गावातील विकास कामांसंदर्भात नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला असता महिला सरपंचानं संतापानं उपसरपंचावर मोबाईल फेकला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.