Jalna Crime News : डोक्यावर टक्कल असताना केसांचा विंग लावून चोऱ्या करणाऱ्या भामटा सापडला आहे. जालन्यातील या चोरट्याला जालना पोलिसांनी  त्याच्या केसाच्या विगमुळेच अटक केली आहे. या चोरट्याने जालना शहरात धुमाकूळ घातला होता. त्याने अनेक ज्वेलर्स तसेच दुकानांवर दरोडा टाकला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जालन्यातील अंबड शहरात गेल्या काही दिवसांत चोरीचं प्रमाण वाढलं होते. कापड दुकान,ज्वेलर्स, दुचाक्या चोरीला गेल्या होत्या. या चोऱ्या करणाऱ्या आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. हा चोरटा त्याच्या डोक्यावर टक्कल असताना डोक्यावर केसांचा विंग लावून चोऱ्या करायचा. 25 वर्षीय मुस्तफा अब्दुल सय्यद असं या आरोपीचं नाव आहे.


डोक्यावर लावलेल्या केसांच्या विंगमुळे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तो वेगवेगळ्या प्रकारे आढळून यायचा. यामुळे चोरटा पोलिसांच्या हाती लागत नव्हता. अखेर हा चोरटा चोरीची दुचाकी घेऊन अंबड शहरात विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला सापळा रचून अटक केली.


त्यानंतर त्याची चौकशी केली असता त्याने अंबड शहरातील वेगवेगळ्या दुकानात केलेल्या चोऱ्यांची कबुली दिली. तसेच पैठण मधून स्कुटी आणि दुचाकी चोरल्याचीही कबुली दिली.पोलीस त्याच्या चोरी करण्याच्या पध्दतीमुळे चक्राऊन गेले आहेत. त्याने आणखी कुठे चोऱ्या केल्या आहेत.याची पोलीस चौकशी करत आहेत.


मोटर सायकल चोरीचे दोन गुन्हे चोवीस तासांत उघड


नाशिक शहरातील पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने उल्लेखनीय केली.  24 तासांत मोटारसायकल चोरणार्‍या अट्टल गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या आहेत. तसेच त्यांच्याकडून दोन गुन्ह्यांची देखील उकल झाली. संजय शिवाजी महाळसकर (41, रा. म्हसोबा वस्ती, ता. कोपरगाव जि. अहमदनगर) याला मोटारसायकल (क्रमांक एमएच 15 जी क्यु 3416) सह ताब्यात घेण्यात आले. तसेच त्याच्याकडे अधिक तपास केल्यावर त्याने भद्रकाली परिसरात देखील मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून टिव्हीएस कंपनीची स्कुटी पेप्ट देखील हस्तगत करण्यात आलीय. 24 तासांच्या आत मोटर सायकल दोन गुन्हे पोलिसांनी उघड केले आहे.


एकाच रात्रीत 24 घरफोडया


साताऱ्यातील वाई तालुक्यात पसरणी, कुसगांव, ओझर्डे, सिद्धनाथवाडी येथे एकाच रात्रीत 24 बंद घरे फोडून सोने आणि रोख रकमेसह लाखोंचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. पसरणी गावात 11 घरे, कुसगांव 4, ओझर्डे 5 आणि सिद्धनाथवाडी येथील 4 घरे चोरट्यांनी फोडली आहेत. महत्वाचे म्हणजे ही सर्व 24 घरे होती. या बंद घरांची कुलपे तोडून सोने आणि रोख रकमेसह मोठा ऐवज लंपास केला. या 24 चोऱ्यांमुळे पोलिसांनाच चोरट्यांनी आव्हान दिले आहे. यामुळे ग्रामीण भागात भीतीचे वातावरण पसरले आहे.