वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेले पाच जण तलावात बुडालेत, दोघांचा मृत्यू
मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या पाच मित्रापैकी दोन जणांचा तळ्यात बुडून मृत्यू झाला.
जालना : मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या पाच मित्रापैकी दोन जणांचा तळ्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना कुंभेफळ गावात येथे घडली. या घटनेनंतर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तळ्यात पोहताना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे पाचही मित्र तलावात बुडाले होते. मात्र, त्यातील तिघांना बाहेर काढ्ण्यात ग्रामस्थांना यश आले. तर दोघे बुडालेत.
नवनाथ प्रभाकर जाधव (१८) आणि विकास नारायण राठोड (१७) या दोघांचा मृत्यू झाला. दरम्यान, तीन जणांना बाहेर काढण्यात ग्रामस्थांना यश आले असून त्यांना जालना येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे, असे उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले.
धक्कादायकबाब म्हणजे, जे दोघे बुडाले त्यांचे मृतदेह पाण्यातच होते. तालुका पोलीस घटनास्थळी असून, त्यांनी अग्निशमन दलाला पाचारण केले आहे. त्यानंतर ते मृतदेह बाहेर काढण्यात आले.