जालना : पालकमंत्री बबनराव लोणीकरांविरोधात याचिका दाखल करणाऱ्या याचिकाकर्त्याला फोनवरून तक्रार मागे घेण्यासाठी धमक्या देण्यात येत असल्याची बाब पुढे आलेय. दरम्यान, जमीन हडपल्याचा आरोपाप्रकरणी लोणीकरांना नोटीस बजावण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिलेत. तर दुसरीकडे याप्रकरणी शेतकऱ्यांनी जालन्याचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडे तक्रारही केली. मात्र या तक्रारींकडे या अधिकाऱ्यांनी सोयीनं दुर्लक्ष केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बबनराव लोणीकरांविरोधात न्यायालयात जाणाऱ्या शेतकऱ्याने आपल्याला धमक्या येत असल्याचं म्हटले आहे. चतुर्वेदेश्वर साखर कारखाण्याच्या शेअर्ससाठी शेतकऱ्यांकडून रक्कम घेऊन जमीन परस्पर लाटल्याचा आरोप करत बळीराम कडपे यांच्यासह काही शेतकरी न्यायालयात गेलेत. मात्र आता प्रकरण थांबवण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या फोनवरून धमक्या येत असल्याचा आरोप कडपे केलाय. 


एकनाथ खडसे, प्रकाश मेहता आणि सुभाष देशमुखांनंतरनंतर आता भाजपचे आणखी एक मंत्री वादात सापडले आहेत. राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्यावर कारखान्याच्या नावाखाली तब्बल ५० एकर जमीन लाटण्याचा आरोप करण्यात आलाय. जालना जिल्ह्यातल्या परतूर तालुक्याच्या लोणी गावात चतुर्वेदेश्वर साखर कारखाना उभारण्याच्या नावाखाली शेतकऱ्यांकडून जमिनी खरेदी केल्या.  मात्र या सर्व जमिनी लोणीकरांनी आपल्याच कुटुंबातल्या सदस्यांच्या नावावर खरेदी केल्याचा आरोप आहे.


चतुर्वेदेश्वर साखर कारखाना काढण्यासाठी शेअर्सच्या नावाखाली पैसे गोळा करून जमीन हडपल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. एक दोन नव्हे तर परंतु, मंठा तालुक्यातली जवळपास ५ हजार शेतकऱ्यांकडून प्रत्येकी ५ हजार रुपये शेअर्सच्या नावाखाली घेतल्याचा आरोप आहे. मात्र कारखाना सुरू न करताच लोणीकरांनी ही जमीन थेट पत्नी आणि मुलासह कुटुंबातील सदस्यांच्या नावावर केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. 


रक्कम परत मिळावी यासाठी पीडित शेतकऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतलीये. याप्रकऱणी याचिकाकर्त्यांची बाजू ऐकून जालन्याचे पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी, साखर आयुक्त यांना आपलं म्हणणं मांडण्यासाठी न्यायालयाने नोटीस बजावली आहे. लोणीकरांनी हे सर्व आरोप फेटाळलेत.