जामखेड दुहेरी हत्याकांडप्रकरणी पाच जणांना अटक
२८ एप्रिलला जामखेडमध्ये राष्ट्रवादीच्या दोन कार्यकर्त्यांवर गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातल्या जामखेडमधील दुहेरी हत्याकांडा प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आलीय. २८ एप्रिलला जामखेडमध्ये राष्ट्रवादीच्या दोन कार्यकर्त्यांवर गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष योगेश राळेभात आणि कार्यकर्ता राकेश राळेभात या दोघांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी माजी सरपंच कैलास माने, प्रकाश माने, दत्ता गायकवाड, सचिन जाधव आणि बापु काळे यांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी दिलीय. आरोपींवर खुनाच्या कटात सहभाग आणि आरोपींना पळून जाण्यास मदत करणे तसेच त्यांना आसरा देणे अशा गुन्ह्याखाली अटक करण्यात आलीय.