धुळे : धुळ्यात जय हिंद विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी व्हाट्सअपचा सकारात्मक वापर करत एक नवा आदर्श माजी विद्यार्थ्यांसाठी घालून दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या जय हिंद विद्यालयातील १९८७ च्या एका बॅचनं व्हॉट्सअप ग्रुपवर एकत्र येऊनआय ८७ हे फाऊंडेशन तयार केलं. माजी विद्यार्थ्यांनी या फाऊंडेशनच्या मदतीने शाळेत अनेक विद्यार्थी प्रिय उपक्रम राबवले आहेत.


नुकतंच या विद्यार्थ्यांनी शाळेत शेकडो पुस्तांची भेट देत ग्रंथालय उभं करून दिलं. आय ८७ फाऊंडेशनचे माजी विद्यार्थी दरवर्षी मुलाना प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम आयोजित करतात. 


एवढंच नाही तर शुद्ध पाण्याची व्यवस्थाही या माजी विद्यार्थ्यांनी उभारून दिली आहे. हुशार मुलांना चालना देण्यासाठी हे माजी विद्यार्थी सदैव तत्परतेनं शाळेत सक्रिय असतात.