मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेच्या झालेल्या कोंडीवर तोंडसुख घेतलं. शिवसेनेचं एनडीएमध्ये किती महत्त्व आहे हे आज स्पष्ट झालं.  तर राष्ट्रवादी काँग्रेस हा युपीएचा भाग असल्याचं सांगत एनडीएमध्ये जाण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचं जयंत पाटील म्हणाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर दुसरीकडे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराबाबत काही बोलायचं नाही असं सांगत विषय टाळला. केंद्रीय मंत्रीमंडळ विस्ताराबाबत पत्रकार परिषद घेऊन बोलू अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिलीये. वांद्रे इथं शिवसेनेच्या आरोग्य शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते.


तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शपथविधीनंतर भाजपवर आगपाखड केली. भाजपचं सरकार आहे. ते मालक आहेत. भाजपकडे सध्या संख्याबळ आहे. मात्र हे आकडे मटक्याप्रमाणे बदलत असतात अशा शब्दांमध्ये त्यांनी भाजपवर आगपाखड केलीय. तसंच हा भाजप सरकारचा विस्तार असल्याचंही संजय राऊत म्हणाले. एनडीए ही फक्त कागदावर आणि बैठका घेण्यापूर्तीच उरली आहे. प्रत्यक्षात एनडीएचा मृत्यू झाल्याची तिखट प्रतिक्रिया राऊत यांनी दिली.