स्वाती नाईक / सुरेंद्र गांगण, नवी मुंबई : नवी मुंबई महापौर आणि उपमहापौर निवडणुकीत राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात लढत पाहायला मिळाली. जयवंत सुतार यांची महापौरपदी निवड करण्यात झाली आहे. तर उपमहापौरपदी काँग्रेसच्या मंदाकिनी म्हात्रे यांची निवड झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महापौर पदासाठी शिवसेनेने आपला उमेदवार रिंगणात उतरवला होता. तर उपमहापौर निवडणुकीसाठी काँग्रेसकडून बंडखोरी झाली होती. सुतार यांनी शिवसेनेच्या सोमनाथ वास्कर यांचा पराभव केला. 


जयवंत सुतार यांना ६७ मते मिळालीत. तर उपमहापौर काँग्रेसच्या मंदाकिनी म्हात्रे यांनी ६४ मते मिळालीत. बंडखोरी  केलेले काँग्रेसच्या उमेदवार वैजयंती भगत  यांना केवळ ३ मते मिळालीत. तसेच शिवसेनेच्या द्वारकानाथ भोईर यांना ३८ मते पडलीत.


प्रथम महापौरपदाची निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र शिवसेनेकडून जोरदार मोर्चेबांधणी करणारे विजय चौगुले यांनी ऐनवेळी माघार घेतल्यामुळे राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा विजय सुकर झाला. जयवंत सुतार यांनी आरामात निवडणूक जिंकली. त्यांना राष्ट्रवादीची ५२, अपक्षांची ५ आणि काँग्रेसची १० अशी एकूण ६७ मते मिळाली.  


सुतार यांनी शिवसेनेचे सोमनाथ वास्कर यांचा पराभव केला. भाजपने मतदान प्रक्रियेवर बहिष्कार टाकला. नवी मुंबई महापालिकेच्या १११ सदस्यांच्या सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसने अपक्षांच्या मदतीने बहुमत मिळवले होते. मात्र काठावरचे बहुमत असल्यामुळे राष्ट्रवादीने काँग्रेसच्या मदतीने सत्ता स्थापन केली. काँग्रेसला पहिले अडीच वर्ष उपमहापौरपदही दिले. काँग्रेसचे १० नगरसेवक आहेत. यावेळी मात्र काँग्रेसमध्ये अंतर्गत बंडाळी दिसून आली.


पालिकेतील पक्षीय बलाबल


एकूण जागा – १११


राष्ट्रवादी +  अपक्ष – ५७


शिवसेना    – ३८


काँग्रेस   – १०


भाजप   – ६