भंडारा : अखेर अडीच तासाच्या अथक प्रयत्नानंतर जयचंद वाघाची सुखरुप सुटका करण्यात आली. उमरेड पवनी अभयारण्याची शान असलेला जयचंद हा वाघ गोसीखुर्द प्रकल्पाच्या मुख्य कालव्यात पडला होता.


सुटकेसाठी वन विभागाची टीम


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिकार करण्याच्या निमित्तानं आलेला जयचंद पाण्यात पडला असावा असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. जयचंदच्या सुटकेसाठी वन विभागाची टीम तातडीने तिथं पोहोचली.


शिडीच्या माध्यमातून बाहेर


त्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू झाले. तब्बल अडीच तासानंतर शिडीच्या माध्यमातून जयचंदला कालव्यातून बाहेर काढण्यात यश आलं. जयचंदला पाहण्यासाठी गावक-यांची मोठी गर्दी जमल्यानं घटनास्थळी पोलिसांचा ताफाही होता.