धुळे : राज्यात युतीचे सरकार स्थापन होण्याआधीच दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपावरून रस्सीखेच सुरु आहे. भाजपा शिवसेनेतील नेते एकमेकावर दबावतंत्र अवलंबत आहेत. दरम्यान पुन्हा विधानसभा निवडणुकीसाठी तयार व्हा, असं खळबळजनक वक्तव्य पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी केले आहे. धुळे शहरात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. धुळे जिल्ह्यातल्या पाच मतदारसंघांचा आढावा रावल यांनी घेतला त्यावेळी भाजपाचे प्रमुख पदाधिकारी आणि नगरसेवक उपस्थित होते. सरकार स्थापन न झाल्यास निवडणुकीसाठी तयार राहण्याचे आदेश रावल यांनी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


धुळे जिल्ह्यातील दोन जागा या अल्प मताने भाजपाच्या हातून गेल्या तर धुळे शहराची जागाही शिवसेनेला सोडण्यात आली होती. या तिन्ही जागांवर पुन्हा विजय मिळवायचा आणि शिंदखेडा आणि शिरपूर या दोन जागा आता निवडून आलेले आहेत. त्याठिकाणी मताधिक्य वाढवायचं अशा सूचना रावल यांनी कार्यकर्त्यांना दिल्या.