जेजूरीला जाणाऱ्या भाविकांसाठी आनंदाची बातमी...
Jejuri Utsav: राज्यात सगळीकडे दिवाळी, नवरात्र आणि गणपतीचा (indian festivals) उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यंदाही भाविकांसाठी आता जेजूरीसाठी (jejuri) देवदर्शनासाठी जाता येणार आहे.
Jejuri Utsav: करोनाच्या दोन वर्षांनंतर आता देवदर्शनाला (devdarshan) जोमानं सुरूवात झाली आहे. त्यामुळे सध्या सगळीकडेच देवदर्शनाला उत्साह आला आहे. करोनाच्या काळात कुणालाच सण - सभारंभ साजरे करता आले नव्हते त्यातून देवर्शनासाठीही लोकांच्या रांगाही फार कमी लागत होत्या. देवदर्शनासाठी या दोन वर्षात कोणालाच बाहेर पडता येत नव्हते आता मात्र दोन वर्षांनंतर सगळे नियम शिथिल (india lockdown) झाल्यामुळे आता सगळ्यांनाच देवदर्शनासाठी बाहेर पडता येत आहे. राज्यात सगळीकडे दिवाळी, नवरात्र आणि गणपतीचा (indian festivals) उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यंदाही भाविकांसाठी आता जेजूरीसाठी (jejuri) देवदर्शनासाठी जाता येणार आहे. (Jejuri Champashashti Shadaratra festival of Shree Khandoba starts from today)
महाराष्ट्राचे कुलदैवत बहुजन समाजाचे लाडके श्रध्दास्थान असलेल्या पुरंदर तालुक्यातील जेजुरीच्या श्री खंडोबा देवाचा अवतार कार्य असणारा धार्मिक चंपाषष्टी षडारात्र उत्सवाला आजपासून गडावरील बालद्वारीत श्री खंडोबा व म्हाळसादेवीच्या उत्सव मूर्तीची घटस्थापना करून प्रारंभ झाला आहे. सहा दिवस चालणारा चंपाषष्टी उत्सव म्हणजेच देवदिवाळीला आज सुरुवात करण्यात आली. विधिवत श्रींच्या उत्सव मूर्ती मुख्य गाभाऱ्यातून बालदवारी येथे आणण्यात आल्या प. पू. आद्य नृसिंह भारती शंकराचार्य करवीर पीठ कोल्हापूर यांचे हस्ते घटस्थापना करण्यात आली. चंपाषाष्टी षडरात्र उत्सवाचे नियोजन जय मल्हार चंपाषाष्टी अन्नछात्र प्रतिष्ठान, श्री मार्तंड देवसंस्थानव समस्त ग्रामस्थ मानकरी, नित्य वारकरी यांचे वतीने केले जाते.
हेही वाचा - 14 वर्षाच्या शाळकरी पोराचे Instagram status पाहून का गाठावं लागलं Police Station?
श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी देवीची यात्रा -
लाखो भाविकांचे श्रद्धा स्थान असलेल्या सातारा जिल्ह्यातील म्हसवड येथील श्री सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरी देवीची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली .दरवर्षी लाखो भाविकांच्या उपस्थितीत हि यात्रा पार पडते. महाराष्ट्र, आंद्रध्रप्रदेश तसेच कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धा स्थान असणारया म्हसवड येथील श्री सिद्धनाथाची यात्रा उत्साहात पार पडली दुष्काळी भागातील सर्वात मोठी यात्रा म्हणून या यात्रेची ओळख आहे. 'सिद्धनाथाच्या नावाने चांगभलच्या' गजरात गुलाल खोबर उधळत श्री सिद्धनाथाची (Siddhanath) आणि जोगेश्वरी देवीची (Jogeshwari Devi) म्हसवडमधून लाकडी रथातून मिरवणूक काढण्यात आली.
हेही वाचा - दुर्दैव! परदेशात मिळाली नोकरीची ऑफर पण घडलं असं की...
लाखो भाविकांचा प्रतिसाद -
यावेळी राज्यातूनच नव्हे तर बाहेर राज्यातील लाखो भाविक (Bhavik) या यात्रेत दर्शनासाठी म्हसवड गावात झाले होते. श्री सिद्धनाथ आणि जोगेश्वरी हे देवस्थान नवसाला पावणारे असल्यामुळे बाहेरून नवस फेडायला येणारे भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. गुलाल (Gulal) आणि खोबऱ्याची उधळण या देवाच्या रथावर करून आपला नवस फेडला जातो. या सोहळ्याला मोठ्या प्रमाणात भाविक गर्दी करतात.
वाशिम येथे पार पडला रथोत्सव -
वाशिम जिल्ह्यासह विदर्भ मराठवाड्याचे (Vidharbha Marthwada) ग्राम दैवत असलेल्या रिसोड तालुक्यातील लोणी गांवातील सखाराम महाराज यांच्या 144 व्या पुण्य तिथीनिमित्त आज रथोत्सव पार पडला. या रथोत्सवाची 144 वर्षांची परंपरा आहे.या यात्रेत परंपरेनुसार रथोत्सव दरवर्षी होत असून यावर्षी देखील ही परंपरा जपली गेली आहे. आदिवासी (Tribal) समाजातील मानकऱ्यांना मान देऊन आज रथोत्सवास प्रारंभ करण्यात आला. रथोत्सवाचे संस्थान च्या वतीनं विधीवत पुजन करून रथोत्सवाची (Rathoutsav) सुरुवात करण्यात आली. यावेळी हजारो भावीक आपला नवस फेडण्यासाठी रथोत्सवात सहभागी झाले होते.