अमोल पेडणेकर, झी मीडिया, ठाणे : महाराष्ट्राच्या राजकारणात आज पुन्हा एकदा मोठी लक्षवेधी घडामोड पहायला मिळाली.  कळवा, मुंब्रा आणि डोंबिवलीत विकासकामांचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या(Chief Minister Eknath Shinde) उपस्थितीत पार पडला. विशेष म्हणजे कळवा पुलाच्या या उद्घाटन सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाडही(Jitendra Awad) उपस्थित होते. यावेळी जितेंद्र आव्हाड आणि खासदार श्रीकांत शिंदे(Srikant Shinde ) यांच्यात जुगलबंदी पहायला मिळाली(maharashtra politics).


जितेंद्र आव्हाड आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या भाषणाने या कार्यक्रमात ट्वि्स्ट आणला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या कार्यक्रमात विकासकामांच्या श्रेयावरून राजकीय फड रंगेल, अशी अपेक्षा होती. मात्र, शिंदे आणि आव्हाड एकाच मंचावर आले आणि हा सोहळा सुरळीत पार पडला. मात्र, जितेंद्र आव्हाड आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या भाषणाने या कार्यक्रमात ट्वि्स्ट आणला. 


मुख्यमंत्र्यांसाठी या ब्रिजचे उद्घाटन थांबवले - जितेंद्र आव्हाड


दोन महिन्यांपूर्वीच या ब्रिजचं काम पूर्ण झालं होतं. मात्र, मुख्यमंत्र्यांसाठी या ब्रिजचे उद्घाटन थांबविण्यात आले होते. अखेर आज या ब्रिज उद्घाटन झालेलं आहे असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.  श्रीकांत शिंदे हे मुख्यमंत्र्यांचे मुलगी आहेत त्यामुळे त्यांच्याशी बोलताना आता जपूनच बोललेलं पाहिजे. चाणक्य आता शकुनी मामा आहे तो याआधी शिंदेंना काय म्हणायचे ते आम्हाला माहित आहे . श्रीकांत शिंदे हे मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र आहेत. त्यामुळे त्यांच्याशी बोलताना आता जपूनच बोललेलं पाहिजे असंही आव्हाड म्हणाले.


श्रेयवादावरुन शिंदे - आव्हाडांमध्ये हेवेदावे


जितेंद्र आव्हाड यांनी पुलासंबंधी काही सूचना भर कार्यक्रमात केल्या, त्यावेळी श्रीकांत शिंदे यांनी त्यांना उत्तर दिलं. आम्ही प्रकल्प पूर्ण केले असा दावा श्रीकांत शिंदे यांनी केला. त्यावर आव्हाड यांनी हे प्रकल्प तुमचे नसून सरकारचे आहेत असं स्पष्टपणे सांगितलं. यावरुन काहीवेळ त्यांच्यात कलगीतुरा रंगलेला दिसून आला. त्यानंतर माध्यमांशी बोलतांना आपल्याला मुख्यमंत्र्यांच्या मुलाकडून धमक्या मिळाल्या अशी प्रतिक्रिया आव्हाडांनी दिली.