Supreme Court Slams Ajit Pawar Camp : राष्ट्रवादीमध्ये पडलेल्या फुटीनंतर अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार गट वेगळे झाले. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह दोन्ही अजित पवारांना दिलं. तरीही अजित पवारांच्या राष्ट्रवादीने शरद पवारांचा फोटो वापरणं सुरुच ठेवलं. आता मात्र अजित पवार गटाला सुप्रीम धक्का बसलाय. कारण अजित पवार गटाला शरद पवारांचा फोटो आणि नावही वापरता येणार नाही. शरद पवारांचा फोटो आणि नाव वापरणार नाही याची बिनशर्त लेखी हमी देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) दिलेत. त्यावरून आता जितेंद्र आव्हाडांनी (Jitendra Awhad) ट्विट करत अजित पवारांना टोला लगावला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय म्हणाले Jitendra Awhad?


जितेंद्र आव्हाडांनी सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या वक्तव्यावर बोट ठेऊन अजित पवारांना टोले लगावले. "आम्हाला लिहून द्या की तुम्ही शरद पवारांचा फोटो आणि नाव वापरणार नाही. शरद पवार हे राजकारणातील उत्तुंग व्यक्तीमत्त्व आहे, त्यांच्या नावाने इतकी वर्ष तुम्ही निवडणुका जिंकल्या आहे. परंतु आता तुम्ही तुमची वेगळी चूल मांडली आहे, तर शरद पवारांचं गुडविल वापरू नका. आत्मविश्वास असेल तर स्वत:ची ओळख निर्माण करा आणि मते मिळवा असं सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला सांगितलं आहे", असं जितेंद्र आव्हाड म्हणतात.


राजकारण म्हणजे फक्त बेरजेचं गणित नसतं. लोकांमध्ये जाऊन, जमिनीवर काम करून स्वत:ची ओळख निर्माण करावी लागते. राजकीय आणि सामाजिक जीवनात नितीमत्ता जपावी लागते. तुमच्या कृतीने तुम्ही स्वत:ची स्वत:च्या अंगावर शिंतोडे उडवून घेतले आहेत, अशी टीका जितेंद्र आव्हाडांनी केली. 'या वयात'ही तुमच्याकडे स्वत:ची ओळख नाही. आमच्या बापाने निर्माण केलेला आणि वाढवलेल्या पक्षावर तुम्ही हक्क सांगताय. आजपर्यंत लोकं तुम्हाला तुमचं अस्तित्त्व विचारत होती, आज सर्वोच्च न्यायालयाने त्यावर शिक्कामोर्तब केले आहे, असंही आव्हाड म्हणाले. 'काका का?' हे आता यांच्या चांगलं लक्षात आलं असेल, असं म्हणत जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांचे चिमटे काढले.


दरम्यान, शरद पवारांच्या फोटोचा आणि नावाचा वापर चुकीच्या पद्धतीने केला जातोय. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाची चांगलीच कानउघाडणी केली. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह असलेल्या घड्याळाची टिकटिकही थांबणार का? असा प्रश्न निर्माण होतोय. कारण शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टातल्या सुनावणीवेळी घड्याळ चिन्ह वापरू न देण्याची मागणी केलीय. पक्ष आणि चिन्ह मिळालं असलं तरी अजित पवार यांना आता शरद पवारांशिवाय आपल्या पक्षाची वेगळी ओळख तयार करावी लागणार आहे.