Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून भाजपने (BJP) विरोधकांच्या महत्त्वाच्या मतदारसंघाकडे आपला मोर्चा वळवळा आहे. यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीवर भाजपने लक्ष्य केंद्रीत केले आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून बारामतीची जोरदार चर्चा आहे. मात्र आता त्यांच्याच पक्षाच्या आमदाराने शरद पवार यांच्या राजकारणाविषयी शंका उपस्थित केल्याची चर्चा सुरु आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना शरद पवार यांचा उल्लेख केला आणि आता वेगळीच चर्चा सुरु झाली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांच्या कारभारवरून त्यांच्यावर टीका केली होती. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यानंतर बोलताना आव्हाड यांनी 'अरे शरद पवारांनी बारामतीत एवढी वर्षे राजकारण केलं, त्यांचंही बारामती होऊ शकलं नाही,' असं वक्तव्य केले आहे. सोशल मीडियावर सध्या जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या विधानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. नवी मुंबईत बुधवारी राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी हे विधान केले आहे.



काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?


"मुख्यमंत्र्यांना वाटतं संपूर्ण ठाणे माझ्या हातात असावं. अरे शरद पवारांनी बारामतीत एवढे वर्षे राजकारण केलं, त्यांचंही बारामती होऊ शकलं नाही. असं कधी असतं का? हे मुख्यमंत्री नाहीत, तर 'व्हाईसरॉय ऑफ महाराष्ट्र' आहेत. व्हाईसरॉय कसा त्याच्या हातात कायदा असल्याप्रमाणे कोणाचंही ऐकायचा नाही. तसेच एकनाथ शिंदे व्हॉईसरॉय आहेत. नवी मुंबईच्या निवडणुका येतील तेव्हा नशीब पोलिसांना मतदान करायला सांगितलं नाही. आता एवढंच शिल्लक राहिलं आहे. नाहीतर पोलिसांना सांगतील तुम्ही जाऊन बटन दाबून या," असे जितेंद्र आव्हाड म्हणताना दिसत आहेत.