नागपूर : संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा खून झाला होता, असं वादग्रस्त वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या फेसबुक लाइव्ह दरम्यान केलंय. यावरून वाद निर्माण झाल्यानंतर त्यांनी आपले वक्तव्य फेसबुकवरून हटवले. मात्र, त्यांच्या या वक्तव्यानं वारकरी संप्रदायाच्या भावना दुखावल्यात. वारकरी सांप्रदायानं आव्हाडांच्या या वक्तव्यावरून आपला निषेध नोंदवलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'जितेंद्र आव्हाड यांनी तुकाराम महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानं वारकरी संप्रदायाच्या भावना दुखावल्या आहेत. त्यांचा निषेध करावा तेवढा कमी आहे' अशी प्रतिक्रिया वारकरी संप्रदायानं नोंदवलीय. 


वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांनी वारकरी संप्रदायाच्या भावना दुखावल्या आहेत. तुकाराम महाराजांबाबत असे बोलण्याचे धाडस त्यांनी केलेच कसे? त्यांच्या या वक्तव्याबाबत त्यांचा निषेध करावा तेवढा कमी आहे, अशा प्रतिक्रिया वारकरी संप्रदायाने नोंदवल्या आहेत.


उल्लेखनीय म्हणजे, भगवत गीतेच्या सक्तीच्या मुद्दयावरून गुरुवारी विधानसभेत मोठे 'रामायण' पाहायला मिळाले. यानंतरही जितेंद्र आव्हाड यांनी फुशारकी मारण्याच्या नादात स्वत:चे चांगलेच हसे करुन घेतले. विधिमंडळातून बाहेर पडल्यानंतर जितेंद्र आव्हाड प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी आव्हाडांनी बोलण्याच्या नादात आपल्याला भगवत गीता मुखोद्गत असल्याचे सांगितले. मग प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनीही नेमका हाच शब्द पकडत जितेंद्र आव्हाड यांना गीतेमधील श्लोक म्हणायला लावले. तेव्हा मात्र, आव्हाडांची चांगलीच तारांबळ उडाली.