दहावी उत्तीर्णांसाठी पोस्टात भरती, परीक्षा न देता मुंबईत मिळेल चांगल्या पगाराची नोकरी
Job For SSC Pass: दहावी उत्तीर्ण असून नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. मुंबईतील टपाल जीवन विमा अंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार असून दहावी उत्तीर्णांना संधी दिली जाणार आहे.
Job For SSC Pass: शिक्षण अवघं दहावी असल्याने नोकरी मिळत नाही असे अनेकजण म्हणत असतात. कमी शिक्षण असेल तर चांगल्या पगाराची नोकरी कोण देणार? असे टोमणे त्यांना ऐकावे लागतात. अशा तरुणांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. दहावी उत्तीर्ण असून नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. मुंबईतील टपाल जीवन विमा अंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार असून दहावी उत्तीर्णांना संधी दिली जाणार आहे.
मुंबईतील टपाल जीवन विमा येथे अभिकर्ता पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी उमेदवारांची कोणती परीक्षा घेतली जाणार नाही. तर थेट मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
उमेदवारांना २१ जून रोजी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी उपस्थित राहावे लागणार आहे.
पोस्टल लाइफ इन्शुरन्स अंतर्गत अभिकर्ता पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
विमा क्षेत्रातील अनुभव असलेल्या व्यक्तींना या नोकरीत प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामुळे विमा तसेच मार्केटींग क्षेत्रात तुम्ही उजवे असणे आवश्यक आहे. १८ ते ५० वर्षे वयोगटातील उमेदवार या पदांसाठी अर्ज करु शकतात.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी वरिष्ठ अधीक्षक डाकघर, उत्तर पश्चिम विभाग यांचे कार्यालय, टपाल जीवन विमा विभाग, दुसरा मजला, मुंबई उत्तर पश्चिम विभाग, समता नगर, मुंबई - 400101 या पत्त्यावर मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे. मुलाखतीला 21 जून रोजी उपस्थित नसलेल्या उमेदवारांचा त्यानंतर नोकरीसाठी विचार केला जाणार नाही.
मुलाखतीला उपस्थित राहताना उमेदवारांकडे लेखी अर्ज, दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्र, पॅन कार्ड, आधारकार्ड ही महत्वाची कागदपत्रे सोबत असणे आवश्यक आहे.