जज बीएच लोया मृत्यू प्रकरण आहे तरी काय?
लोया यांचं आपल्या सहकाऱ्याच्या मुलीच्या लग्नाला जाताना हार्ट अटॅकने निधन झालं. मात्र यावेळी लोया यांच्या बहिणीने..
नागपूर : देशभरात गाजलेलं जज बी एच लोया संशयास्पद मृत्यू प्रकरण आहे तरी काय? असा सवाल अनेकांना पडला आहे. जज बी एच लोया सीबीआय न्यायालयाचे विशेष जज होते. लोया यांच्याकडे सोहराबुद्दीन शेख चकमक प्रकरणाची सुनावणी होती. मात्र त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला, न्यायव्यवस्थेत ज्यांना न्यायमूर्ती म्हटलं जातं, त्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्यामुळे, या प्रकरणावरून देशभरात वादंग सुरू आहे.
जज लोया मृत्यू प्रकरण
जज बी एच लोया, म्हणजेच जज ब्रिजमोहन हरिकिशन लोया यांचा नागपुरात १ डिसेंबर २०१४ मृत्यू झाला. लोया यांचं आपल्या सहकाऱ्याच्या मुलीच्या लग्नाला जाताना हार्ट अटॅकने निधन झालं. मात्र यावेळी लोया यांच्या बहिणीने आपल्या भावाचा मृत्यू संशयास्पद असल्याचं सांगून काही प्रश्न उपस्थित केले. लोया यांच्याकडे सोहराबुद्दीन केसशी संबंध होता, यावरून त्यांच्या अचानक झालेल्या मृत्यूवर संशय उपस्थित करण्यात आला.
बॉम्बे लॉयर्स असोसिएशनकडून मुंबई हायकोर्टात, जज लोया यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्याची याचिका, 8 जानेवारी रोजी दाखल करण्यात आली होती.
जज लोया यांच्या मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी नाही होणार- सुप्रीम कोर्ट
जज बी एच लोया यांच्या मृत्यूप्रकरणी सीबीआय चौकशी होणार नसल्याचं, सुप्रीम कोर्टाने आज आपल्या निकालात म्हटलं आहे.जज लोया यांच्या मृत्यूची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे. सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती अजय खानविलकर यांच्या खंडपीठाने आज हा निर्णय दिला आहे.विशेष सीबीआय न्यायाधीश लोया हे सोहराबुद्दीन बनावट चकमकीच्या खटल्याची सुनावणी करत होते. या खटल्यात भाजप अध्यक्ष अमित शहा आरोपी होते.
जज लोया आपल्या सहकाऱ्याच्या मुलीच्या लग्नासाठी १ डिसेंबर २०१४ रोजी नागपूरला गेले. लोया तिथं त्यांचा मृत्यू झाला. पण कॅराव्हान मॅगेझिननं ४ महिन्यांपूर्वी लोयांचा मृत्यू संशयास्पद असल्याची बातमी दिली, यानंतर देशभर या प्रकरणाने खळबळ उडाली होती. आज याविषयीच्या सर्व याचिका सुप्रीम कोर्टाने निकालात काढल्या आहेत.